Alcohol Fact : व्हिस्कीवर बिअर की बिअरवर व्हिस्की? नंतर कोणतं ड्रिंक प्यायल्याने कमी त्रास होतो? एक्सपर्ट्स काय सांगतात वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पार्टी रंगात येते आणि घरी आणलेली दारू कमी पडू लागते. रात्रीच्या वेळी दुकानं बंद असतात, मग घरात जे उपलब्ध आहे म्हणजे बिअर संपली की व्हिस्की किंवा व्हिस्की संपली की रम असं काहीही मिक्स करून प्यायलं जातं.
advertisement
1/10

31 डिसेंबरच्या रात्री अनेक घरांमध्ये आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये पार्ट्यांचा माहोल असेल. जुन्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना सेलिब्रेशन तर होणारच, पण अनेकदा होतं काय, पार्टी रंगात येते आणि घरी आणलेली दारू कमी पडू लागते. रात्रीच्या वेळी दुकानं बंद असतात, मग घरात जे उपलब्ध आहे म्हणजे बिअर संपली की व्हिस्की किंवा व्हिस्की संपली की रम असं काहीही मिक्स करून प्यायलं जातं.
advertisement
2/10
दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मग भयंकर हँगओव्हर, उलट्या आणि डोकेदुखीने जीव नकोसा होतो. म्हणूनच, कशावर काय प्यायलं तर त्रास कमी होतो, हे जाणून घेणं मद्यप्रेमींसाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे त्यांचा दुसऱ्या दिवशीचा त्रास कमी होणार आहे. खरंतर याचं एक विज्ञान आहे.
advertisement
3/10
व्हिस्कीवर बिअर की बिअरवर व्हिस्की? आधी कोणतं ड्रिंक प्यायल्याने कमी त्रास होतो?जगभरात मद्यप्रेमींमध्ये एक जुनी इंग्रजी म्हण प्रसिद्ध आहे: Beer before liquor, never been sicker; liquor before beer, you’re in the clear.
advertisement
4/10
याचा सोपा अर्थ असा की, जर तुम्ही आधी बिअर प्यायली आणि नंतर व्हिस्की किंवा रमसारख्या कडक दारूकडे (Hard Liquor) वळलात, तर तुमची तब्येत बिघडण्याची आणि उलट्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण जर तुम्ही आधी कडक ड्रिंक (व्हिस्की/रम) घेतलं आणि नंतर बिअर घेतली, तर शरीराला होणारा त्रास तुलनेने कमी असतो.
advertisement
5/10
1. बिअरमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो (जो बुडबुड्यांच्या स्वरूपात दिसतो). जर तुम्ही आधी बिअर प्यायली आणि त्यानंतर व्हिस्की घेतली, तर बिअरमधील हा गॅस तुमच्या जठराच्या अस्तरावर परिणाम करतो, ज्यामुळे त्यानंतर प्यायलेली कडक दारू शरीर वेगाने शोषून घेतं. यामुळे दारू खूप लवकर डोक्यात चढते आणि भयंकर हँगओव्हर होतो.
advertisement
6/10
2. बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 5-8% असतं, तर व्हिस्कीमध्ये ते 40-42% असतं. हलक्या ड्रिंककडून अचानक कडक ड्रिंककडे गेल्यावर यकृतावर (Liver) एकदम ताण येतो. याउलट, आधी व्हिस्की घेतल्यावर शरीर हाय-अल्कोहोलसाठी तयार असतं, त्यानंतर बिअर घेतल्यास अल्कोहोलचं प्रमाण पातळ (Dilute) व्हायला मदत होते.
advertisement
7/10
हे तर झालं बिअर आणि इतर हार्ड ड्रिंकबद्दल पण आता जिथे प्रश्न हार्डड्रिंकचा असतो, तिथे काय?अशावेळी रंगाचा नियम पाळा शक्यतो 'लाईट' रंगाच्या दारूवरून (उदा. व्होडका किंवा जिन) थेट 'डार्क' रंगाच्या दारूकडे (उदा. जुनी व्हिस्की किंवा रम) वळू नका. डार्क दारूमध्ये 'कन्जेनर्स' (Congeners) नावाचे घटक जास्त असतात, जे डोकेदुखी वाढवतात.
advertisement
8/10
म्हणजेच काय तर तुम्ही वोडकासंपला तर टकिला, जिन, व्हाईट वाईन पिऊ शकता. किंवा टकिला, जिन, व्हाईट वाईन हे पदार्थ एकमेकांसोबत पिऊ शकता. तसेच डार्क दारु म्हणजे रमवर व्हिस्की आणि व्हिस्कीवर रम पिऊ शकता.पण शक्यतो मिक्सिंग टाळा. रात्री उशिरा दारू संपली म्हणून मित्राची दुसरीच बाटली काढण्याचा विचार काढून टाका. कारण या ट्रिकने त्रास कमी होईल, पण त्रास तर होणाच. त्यामुळे शक्य असेल तर मिक्सिंग नकोच.
advertisement
9/10
हँगओव्हर टाळण्यासाठी 'गोल्डन' टिप्स1. रिकाम्या पोटी पिणे म्हणजे संकट दारू पिण्यापूर्वी भरपेट जेवण करा किंवा पनीर, शेंगदाणे, चिकन असे प्रथिनयुक्त पदार्थ खा. यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळण्याचा वेग मंदावतो.2. पाण्याचा विसर पडू देऊ नका: दारू शरीरातील पाणी शोषून घेते (Dehydration). त्यामुळे प्रत्येक पेगनंतर एक ग्लास पाणी पिण्याचा नियम करा. याला 'स्पेसिंग' म्हणतात.3. साखर टाळा दारूमध्ये कोल्ड्रिंक्स किंवा जास्त साखर असलेले ज्यूस मिसळू नका. साखरेमुळे दुसऱ्या दिवशीचं डोकेदुखीचं प्रमाण दुप्पट होतं.
advertisement
10/10
आपण पार्टीत फ्लोमध्ये असतो आणि "अरे काय होतंय, घे की!" असं म्हणत मिक्सिंग करतो. पण लक्षात ठेवा, तुमचं यकृत (Liver) एका तासात फक्त एक छोटा पेग पचवू शकतं. जेव्हा तुम्ही बिअर आणि व्हिस्कीची भेसळ करता, तेव्हा यकृताला नेमकं कशावर काम करायचंय हे कळत नाही आणि मग सुरू होतो तो 'सकाळचा हँगओव्हरचा त्रास'.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol Fact : व्हिस्कीवर बिअर की बिअरवर व्हिस्की? नंतर कोणतं ड्रिंक प्यायल्याने कमी त्रास होतो? एक्सपर्ट्स काय सांगतात वाचा