जान्हवी किल्लेकरचा 'तो' एक शब्द अख्या कुटुंबाला महागात, नवऱ्यानं सांगितलं त्यांच्यासोबत काय घडतंय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
भाग्य दिले तू मला मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे. बिग बॉसच्या घरात जाऊन ट्रोल झालेल्या जान्हवीच्या कुटुंबियांना देखील याचा त्रास झाला आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीच्या दोन आठवड्यात जान्हवीचं वागणं सगळ्यांना खटकलं. तिच्या उद्धट बोलण्याने तिनं घरातील अनेक सदस्यांचा अपमान केला आणि त्याची शिक्षा तिला मिळाली.
advertisement
2/7
जान्हवीनं आधी वर्षा उसगावकर यांचा अपमान केला. त्यानंतर त्यांच्या मातृत्वावर तिनं भाष्य केलं. अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांना ती ओव्हर एक्टिंग करता असं म्हटलं. जान्हवीचे हे सगळे शब्द तिच्याबरोबर तिच्या कुटुंबालाही महागात पडले.
advertisement
3/7
जान्हवीचा नवरा किरण किल्लेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. जान्हवी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर ट्रोल झाली पण इथे तिच्या कुटुंबाबरोबर नेमकं काय घडतंय हे सांगितलं.
advertisement
4/7
किरण यांनी भावना व्यक्त करत म्हटलं, " माझ्या पर्सनॅलिटीकडे पाहून लोकं नावं ठेवतात. माझ्या मुलाबद्दलही अत्यंत गलिच्छ शब्दांत ते कमेंट्स करतात".
advertisement
5/7
"मी डुक्कर आहे, माकड आहे असं हिनवतात. हा काय गव्हर्नमेंट नोकरीवाला असेल. जान्हवी बरोबर होती पण तिने शब्द चुकीचे वापरले. तिला बाहेर आल्यानंतर हे सगळं पाहून खूप मोठा धक्का बसेल".
advertisement
6/7
किरण किल्लेकर पुढे म्हणाले, "माझ्या घरातल्या सगळ्यांना ट्रोल केलं जात आहे, जान्हवीची जाऊ सुद्धा तशीच असेल तिच्याकडूनच ती शिकून आली असेल असं बोलतात".
advertisement
7/7
"कधी कधी माझा मुलगा मला कमेंट्स येऊन दाखवतो तेव्हा ते वाचून त्याला कसं सांगू की हे काय लिहिलंय इतक्या गलिच्छ शब्दांत त्याच्याबद्दल लिहिलं जातं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जान्हवी किल्लेकरचा 'तो' एक शब्द अख्या कुटुंबाला महागात, नवऱ्यानं सांगितलं त्यांच्यासोबत काय घडतंय?