TRENDING:

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा बदल! अक्षय मुदवाडकरच्या जागी हा अभिनेता स्वामींच्या भूमिकेत

Last Updated:
Jai Jai Swami Samarth Serial : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ भूमिकेत बदल झाला आहे. अक्षय मुदवाडकरऐवजी प्रसिद्ध अभिनेते स्वामींची भूमिका साकारणार आहेत.
advertisement
1/10
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा बदल! अक्षय मुदवाडकरच्या जागी हा अभिनेता स्वामींच्या भूमिकेत
मराठी मालिकांच्या छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'.
advertisement
2/10
या मालिकेत आता एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. 2020 पासून कलर्स मराठीवर सुरू असलेली ही मालिका प्रेक्षकांना अध्यात्मिक आणि सकारात्मक विचार देत आहे.
advertisement
3/10
मात्र आता या मालिकेत स्वामी समर्थांच्या भूमिकेत मोठा बदल करण्यात आला आहे. गेली पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता अक्षय मुदवाडकर आता या भूमिकेत दिसणार नाहीत.
advertisement
4/10
अक्षय मुदवाडकरच्या जागी आता अभिनेते सुनिल गोडसे स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी मालिकेत त्यांची एन्ट्री झाली आहे. त्यांचा पहिला एपिसोडची टेलिकास्ट झाला आहे.
advertisement
5/10
अभिनेता अक्षय मुदवाडकरने साकारलेली स्वामी समर्थांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यांच्या शांत, गंभीर आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांनी ही भूमिका जिवंत केली होती. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांच्याशी एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.
advertisement
6/10
दरम्यान या बदलानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. काहींनी नव्या अभिनेत्याचं स्वागत केलं असलं तरी अनेक प्रेक्षकांनी जुन्या स्वामींना परत आणण्याची मागणी केली आहे.
advertisement
7/10
"जुने स्वामी छान होते त्यांना पुन्हा आणा", "त्यांचाच लूक परफेक्ट होता" अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा बदल प्रेक्षकांसाठी थोडा भावनिक ठरत असल्याचं दिसून येत आहे.
advertisement
8/10
नवीन स्वामींची भूमिका साकारणारे सुनिल गोडसे हे मराठी मनोरंजन विश्वातील अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी अनेक वर्षे विविध मालिका, नाटकं आणि सिनेमांमधून काम केलं आहे.
advertisement
9/10
सध्या ते 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सयाजीराव ही भूमिका साकारत आहेत. तसेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत वर्षा उसगांवकर यांच्या पतीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. याशिवाय 'रणरागिणी ताराराणी' या नाटकातही त्यांनी आपली अभिनयाची छाप सोडली आहे.
advertisement
10/10
आता सुनिल गोडसे स्वामी समर्थांची भूमिका कशी साकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ही भूमिका केवळ अभिनयाची नाही, तर श्रद्धा आणि भावनांशी जोडलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक नव्या स्वामींना कितपत स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा बदल! अक्षय मुदवाडकरच्या जागी हा अभिनेता स्वामींच्या भूमिकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल