TRENDING:

आजोबा माजी CM तर वडील 5 वेळा आमदार; अभिनेता व्हिलन बनून देतोय बॉलिवूडच्या हिरोना टक्कर

Last Updated:
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे नॉन फिल्मी घरातून येत चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्यातील काही जण मात्र राजकारणी घरातील आहेत. यात प्रामुख्यानं रितेश देशमुखचं नाव घेतलं जातं, त्याचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्याच्याशिवाय बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, याचे आजोबा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानं बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली, आज तो चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये चांगलं नाव कमावतोय. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या.
advertisement
1/9
आजोबा माजी CM तर वडील 5 वेळा आमदार; अभिनेता व्हिलन बनून देतोय बड्या हिरोना टक्कर
बॉलिवूडचा हा अभिनेता आहे सनी लियोनीच्या 'जिस्म २' मधील अरुणोदय सिंग. 6 फूट 4 इंच उंची आणि भारदस्त शरीरयष्टी असलेला अरुणोदय व्हिलनच्या भूमिकेत एकदम परफेक्ट बसतो.
advertisement
2/9
अरुणोदयचा जन्म 17 फेब्रुवारी 1983 रोजी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका राजकारणी कुटुंबात झाला होता.
advertisement
3/9
अरुणोदय सिंगचं संपूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह हे अरुणोदयचे आजोबा आहेत.
advertisement
4/9
अर्जुन सिंह केवळ तीन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांनी पाच वेळा केंद्रीय मंत्री आणि एकदा राज्यपाल पदही भूषवलं.
advertisement
5/9
एवढंच नाही तर अरुणोदयचे वडीलही 5 वेळा आमदार राहिले आहेत. एवढ्या राजकीय घराण्यातील असूनही अरुणोदय सिंग यांनी राजकारणाऐवजी अभिनय क्षेत्राची निवड केली.
advertisement
6/9
अरुणोदयने न्यूयॉर्कमधून अभिनयाचे शिक्षणही घेतले आहे.
advertisement
7/9
अरुणोदयचा पहिला चित्रपट 2009 मध्ये आला होता. चित्रपटाचे नाव होते 'सिकंदर'. यानंतर त्याने आयशा, ये साली जिंदगी, जिस्म 2, मोहेंजो दारो या चित्रपटांशिवाय त्याने बुद्ध इन ट्रॅफिक जॅम सारखे चित्रपटही केले. पण त्याला हवं तसं नाव कमावता आलं नाही.
advertisement
8/9
अरुणोदय सिंगला खरी ओळख वेब सीरिजमधून मिळाली. एकता कपूरच्या 'अपहरण' या वेब सीरिजमध्ये रुद्र श्रीवास्तवची भूमिका साकारून त्यानं प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली. त्यानंतर तो नेटफ्लिक्सच्या 'ये काली काली आँखे' मध्येही झळकला.
advertisement
9/9
आज अरुणोदय राजकारणापासून दूर असून चित्रपटसृष्टीत नाव कमावतो आहे. मात्र, अरुणोदय सिंग कधी-कधी निवडणुकीत वडिलांच्या प्रचारासाठी नक्कीच जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आजोबा माजी CM तर वडील 5 वेळा आमदार; अभिनेता व्हिलन बनून देतोय बॉलिवूडच्या हिरोना टक्कर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल