जुई गडकरीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Jui Gadkari : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
advertisement
1/7

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
advertisement
2/7
जुई गडकरीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
3/7
जुई गडकरीच्या आजोबांचं निधन झालं आहे. आजोबांच्या अकाली निधनाने जुई गडकरी सध्या दु:खात आहे.
advertisement
4/7
जुई गडकरीचं आपल्या आजोबांसोबत खूप घट्ट नातं होतं. अभिनेत्री आपल्या आजोबांना प्रेमाने 'आण्णु' अशी हाक मारत असे.
advertisement
5/7
जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर जुई गडकरी भावूक झालेली पाहायला मिळाली होती. लाडक्या पूर्णा आजीसाठी तिने सोशल मीडियावर खास पोस्टदेखील लिहिली होती.
advertisement
6/7
जुई गडकरीचे वडील नाटककार आणि तालवादक आहेत. तर ती राम गणेश गडकरी यांची पणती आहे.
advertisement
7/7
जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर राज्य करत आहे.