TRENDING:

Weather Update: तो गेला अन् ती आली! मराठवाड्यात अचानक हवा बदलली, IMD कडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने माघार घेताच थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाड्यातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
तो गेला अन् ती आली! मराठवाड्यात अचानक हवा बदलली, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
नोव्हेंबर महिन्यातील पावसानंतर राज्यात हवामानात मोठे बदल झाले आहेत. उत्तररेकडील शीत वारे महाराष्ट्रात गारठा वाढवत आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिक विभाग मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा कमलीचा घसरला आहे. रविवारी मराठवाड्यात हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमानात मोठी घसरण झाली असून पारा 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान जाणवेल.
advertisement
3/5
मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यातील तापमानात देखील मोठी घट झाली आहे. आज किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. तापमान अचानक झालेल्या घटीमुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे.
advertisement
4/5
नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता पावसाने ब्रेक घेतला असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आता निरभ्र आकाश आणि सकाळी थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा तडाखा अशी स्थिती आहे. पुढील काही दिवस असेच हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठाड्यात गारठा वाढल्याने रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गहू हरभरा उत्पादक शेतकरी आनंदात आहे. तर अचानक थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे स्वेटर आणि गरम कपडे खरेदी केली जात असून नागरिकांनी आरोग्य सांभाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Update: तो गेला अन् ती आली! मराठवाड्यात अचानक हवा बदलली, IMD कडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल