सुपर फ्लॉप ते वर्ल्ड कप विनर, गौतम गंभीरने सांगितलं 3 मॅचनं कसं बदललं संजूचं आयुष्य
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गौतम गंभीरने संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आणि त्याला पाठिंबा दिला. संजूने आपल्या कौशल्यातून टीम इंडियासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.
advertisement
1/6

संजू सॅमसन चालला तर तुफान नाहीतर सारं काही पाण्यात अशी गत होती. त्यामुळे संजूला वर्ल्ड कपसाठी संधी देण्यावरुन अनेकवेळा बोललं गेलं. ट्रोल होऊनही संजू सॅमसनवर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीरने विश्वास दाखवला. त्याच्याकडे कौशल्य आहे आणि त्याचा योग्य वापर होऊ शकतो असा ठाम विश्वास गौतम गंभीरला होता. त्यामुळे त्याने बाकी गोष्टींचा विचार बाजूला ठेवून त्यांनी संजूवर विश्वास दाखवला.
advertisement
2/6
अनेकदा संजूला त्याच्या खराब फॉर्ममुळे टीममधून बाहेर जावं लागलं आहे. पण गेल्या काही काळापासून संजू ज्या आक्रमक अवतारात खेळतोय, त्यामागे एक खंबीर पाठिंबा आहे, तो म्हणजे गौतम गंभीरचा. संजू सॅमसनला वारंवार संधी देण्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते, पण आता गंभीरने स्वतः यावर मौन सोडलं असून संजूला पाठिंबा देण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
advertisement
3/6
संजू खूप टॅलेंट आहे ही गोष्ट सगळ्यांनी वारंवार पाहिली आहे, तो खराब फॉर्ममध्ये होता, तो एक काळ असतो, त्याच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं होतं. त्याला पाठिंबा देण्याची गरज होती. मला नेहमीच असं वाटायचं की संजूमध्ये देशाला देण्यासारखं खूप काही आहे. त्याच्याकडे असलेली फटकेबाजीची क्षमता दुर्मीळ आहे.
advertisement
4/6
मला फक्त त्याला हे सांगायचं होतं की, तू तुझ्या शैलीत खेळ, टीम मॅनेजमेंट तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. हा विश्वास फक्त मी त्याला दिला. त्यानंतर जे झालं ते संपूर्ण देशानं पाहिलं आहे.
advertisement
5/6
गंभीर म्हणाला की, एक काळ असा होता की संजू शून्यावर बाद झाला की सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. अशा कठीण काळातही गंभीरने संजूचा हात सोडला नाही. एखाद्या खेळाडूला त्याची जागा सुरक्षित असल्याची जाणीव करून दिली, की तो अधिक चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करू शकतो. संजूनेही सलग शतकं ठोकून हा विश्वास सार्थ ठरवला.
advertisement
6/6
गंभीरने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आता संजू टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरत आहे. तो फक्त विकेटकीपर नाही तर टीम इंडियासाठी मजबूत कणा होतोय ही एक जमेची बाजू आहे. संजूच्या वाईट काळात गंभीरने त्याला दिलेली साथ आणि त्याने याचा गैरफायदा न घेता आपल्या कौशल्यातून टीम इंडियासाठी जे योगदान दिलं ते फार महत्त्वाचं आहे असं गंभीरने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
सुपर फ्लॉप ते वर्ल्ड कप विनर, गौतम गंभीरने सांगितलं 3 मॅचनं कसं बदललं संजूचं आयुष्य