पन्ना कुणी घालावा याबद्दल सांगायचं तर, हे रत्न सगळ्यांनाच मानवतं असं नाही, त्यामुळे कुंडली दाखवणं गरजेचं असतं. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने या राशीच्या लोकांसाठी पन्ना खूपच फायदेशीर ठरतो. जर तुमच्या कुंडलीत विद्या किंवा भाग्याच्या स्थानी मिथुन किंवा कन्या रास असेल, तर हे रत्न नक्कीच शुभ फळं देतं. विद्यार्थ्यांशिवाय ज्यांचं काम बोलण्याशी किंवा कल्पकतेशी संबंधित आहे, जसं की लेखक, मार्केटिंगची माणसं किंवा कलाकार, त्यांनीही पन्ना घातल्यास त्यांना फायदा होतो.
advertisement
निद्रादेवी अजून तुम्हाला माहीत नाही? झोपताना 1 काम, टेन्शनमध्येही लागते शांत झोप
हे रत्न घालण्याची एक खास पद्धत आहे. पन्ना नेहमी शुक्ल पक्षातील बुधवारी सकाळी सूर्योदयानंतर घालावा. रत्न घालण्यापूर्वी ते कच्चे दूध, गंगाजल, मध आणि साखरेच्या मिश्रणात ठेवून शुद्ध करून घ्यावं. त्यानंतर देवासमोर धूप-दिवा लावून 'ॐ बुं बुधाय नमः' या मंत्राचा जप करावा. देवाची पूजा झाल्यावर ती अंगठी विष्णूच्या चरणांना लावून आपल्या हाताच्या सगळ्यात लहान बोटात म्हणजेच करंगळीत घालावी.
एक नव्हे तीन कारणांसाठी साजरा करतात गुढी पाडव्याचा सण; धार्मिक विधी कसे करतात?
पन्ना घातल्याने मनाची भटकंती थांबते आणि अभ्यासात चित्त एकाग्र होतं. खूप वाचूनही जे लक्षात राहत नाही, अशा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास यामुळे मदत होते. बुद्धी तल्लख होते आणि मनातले फालतू विचार कमी होऊन एक प्रकारचा आत्मविश्वास अंगात येतो.
