Kitchen Hacks : पुऱ्या-भजी तळताना खूप शोषतात? बदला तुमची पद्धत; पदार्थ तेलकट होणार नाही, बनेल क्रिस्पी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to avoid more oil absorption while frying : बऱ्याचदा जेव्हा आपण पुऱ्या किंवा भजी तळतो, तेव्हा त्या तेलकट होतात. म्हणजेच खूप तेल शोषतात. मात्र या समस्येवर काही सोप्या ट्रिक्स तुमची मदत करू शकतात. फक्त पदार्थ तळण्याची तुमची पद्धत थोडीशी बदला. तेलाचीही बचत होईल आणि तुम्हाला ऑईली पदार्थ खाल्ल्याचा गिल्टही येणार नाही.
advertisement
1/7

काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही कमी तेलकट पदार्थ बनवू शकता. यामुळे तुम्हाला पदार्थांची चव अगदी परफेक्ट मिळेल, ते क्रिस्पीही होतील आणि विशेष म्हणजे जास्त तेल शोषणार नाहीत. चला पाहूया कसे.
advertisement
2/7
सर्वात आधी तर तुम्ही तळण्यासाठी कशी कढई किंवा पॅन वापरावा हे समजून घेणं आवश्यक आहे. ते स्वच्छ असावे, त्यावर कोणतेही तळणाचे जळालेले तुकडे किंवा चिकटलेले तेल असेल तर ते काढून स्वच्छ करा. कारण यामुळे पदार्थ तळताना जास्त तेल शोषू शकतात.
advertisement
3/7
तुम्ही भजी बनवत असाल तर त्याचे पीठ थोडे पातळ ठेवा. कारण पीठ खूप घट्ट असल्यास ते तेल जास्त तेल शोषून घेते. म्हणून पीठ हलकं आणि पातळ असावं. भजी थोडी हलकी आणि करसपी बनवण्यासाठी तुम्ही त्यात थोडं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर टाकू शकता.
advertisement
4/7
जेव्हा तुम्ही भाज्या, चिकन किंवा मासे तळणार असाल असाल तेव्हा ते तळण्यापूर्वी हलके बोली करून घ्या. यामुळे हे पदार्थ तळताना लवकर शिजतात आणि तेलामध्ये कमी काळ राहिल्याने जास्त तेलकटही होत नाही. शक्य असल्यास ही स्टेप नक्की फॉलो करा.
advertisement
5/7
तळताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तेलाचं तापमान. तेल व्यवस्थित गरम नसेल तर पदार्थ हळूहळू टाळले जातात आणि जास्त तेल शोषतात. म्हणून तेल योग्य तापमानात असावं. जेणेकरून पदार्थ कमी तेलात क्रिस्पी होतील.
advertisement
6/7
व्यवस्थित पदार्थ तळल्या गेल्यानंतर त्याला फारसं तेल राहत नाही. मात्र तरीही थोडं राहिल्यास, त्यासाठी पदार्थ टिश्यू पेपर ठेवा. यामुळे जास्तीचे तेल शोषले जाईल आणि पदार्थांमधलं तेल आणखी कमी होईल.
advertisement
7/7
तसेच तुम्ही पिठामध्ये तळताना चिमूटभर बेकिंग सोडा किंवा सोडा वॉटर घालू शकता. यामुळे पिठात लहान बुडबुडे तयार होतात आणि तळल्यावर पदार्थ हलके आणि क्रिस्पी आवरण तयार होते. तसेच तेलही कमी शोषले जाते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : पुऱ्या-भजी तळताना खूप शोषतात? बदला तुमची पद्धत; पदार्थ तेलकट होणार नाही, बनेल क्रिस्पी