Tips To Buy Lemons : गोल की लांब, पिवळं की हिरवं.. कोणत्या लिंबामध्ये असतो जास्त रस? सोप्या टिप्सने ओळखा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to choose juicy lemon : उन्हाळा सुरु झालाय आता वेगवेगळी सरबतं घरात बनायला लागतात. सर्वात आधी आणि सोपा प्रकार असतो तो म्हणजे लिंबू सरबताचा. लिंबू सरबत बनवण्यासाठी आपल्या फ्रेश आणि रसाळ लिंबं हवी असतात. तीच कशी ओळखायची यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.
advertisement
1/7

लिबूपाणी बनवण्यासाठी लागणारी लिंबं जास्त रसदार असतील सरबतही चव येते आणि तुमचे पैसेही वाचतात. कारण रसाळ लिंबू असेल तर कमी लिंबामध्ये जास्त सरबत बनतं आणि उन्हाळ्यामध्ये लिंबं महाग होतात. म्हणूनच रसाळ लिंबू कसं ओळखायचं याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.
advertisement
2/7
फ्रेश आणि रसाळ लिंबू निवडणं लोकांना अनेकदा कठीण जातं. लिंबं बाहेरून रसाळ आणि ताजे दिसतात, पण आतून कोरडे आणि कडक असतात. असे लिंबू बाजारातून घरी आणल्यावर कळते त्यात रस नसतो किंवा ते कुजलेले असते.
advertisement
3/7
लिंबू खरेदी करताना चांगलं लिंबू निवडण्यासाठी लिंबाचे वजन तपासा. मोठे लिंबू लहान लिंबांपेक्षा जास्त रसाळ असण्याची शक्यता जास्त असते. म्हणू शक्यतो मोठे आणि वजनदार लिंबू खरेदी करा.
advertisement
4/7
लिंबू खरेदी करताना ते मऊ आहे की कठीण आहे, हे बोटांनी दाबून तपासा. लिंबू जितका मऊ असेल तितकाच त्यात रस जास्त असेल. पण लिंबू जास्तच दाबू नका नाहीतर ते लवकर खराब होऊ शकते.
advertisement
5/7
लिंबाची सलंही तपासा. जर लिंबाची साल खडबडीत दिसत असेल तर समजून घ्या की ते पूर्णपणे पिकलेले नाही. गुळगुळीत सालीचं लिंबू शोधा आणि खडबडीत सालीचे लिंबू घेणे टाळा.
advertisement
6/7
लिंबाचा रंग थोडासा चमकदार आणि पिवळा असेल तर लिंबू खरेदी करा. कारण पिकलेल्या लिंबाचा रंग गडद पिवळा असतो. ते जास्त रसाळ लिंबू असते. लहान हिरवे लिंबू टाळा, कारण ते सहसा पिकलेले नसतात आणि त्यात रस खूप कमी असतो.
advertisement
7/7
लिंबावर तपकिरी डाग आहेत का ते तपासा. कधीकधी जास्त पिकलेल्या लिंबूंवर तपकिरी डाग दिसतात, जे बुरशीचे लक्षण असते. जेव्हा तुम्ही असे लिंबू कापता तेव्हा त्यातून दुर्गंधी येतो. असे लिंबू घेणं शक्यतो टाळा. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips To Buy Lemons : गोल की लांब, पिवळं की हिरवं.. कोणत्या लिंबामध्ये असतो जास्त रस? सोप्या टिप्सने ओळखा