TRENDING:

Kitchen Tips : उन्हाळ्यात दही खूप आंबट होतंय? 'या' टिप्स फॉलो करा, आठवडाभर राहील फ्रेश आणि चवदार!

Last Updated:
How to prevent curd from turning sour : आपल्याकडे रोजच्या जेवणासोबत दही खाल्लंच जातं. उन्हाळ्यात तर दही खाण्याचं प्रमाण आणखी वाढतं. बरेच लोक यामुळं घरीच दही बनवतात. पण उन्हाळ्यात बऱ्याचदा दही आंबट बनतं. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत, ज्याद्वारे दही बराच काळ फ्रेश आणि चवदार राहील.
advertisement
1/5
उन्हाळ्यात दही खूप आंबट होतंय? या टिप्स फॉलो करा, आठवडाभर राहील फ्रेश आणि चवदार!
दही आंबट होऊ द्यायचं नसेल तर तर ते फ्रिजमध्ये योग्य पद्धतीनं ठेवणं आवश्यक आहे. फ्रिजमधून सारखं दही आत बाहेर केल्याने किंवा ते फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवल्याने त्याच्या तापमानात चढ उत्तर होतो. त्यामुळे दही लवकर आंबट होत. म्हणून दही फ्रिजच्या मध्यभागी ठेवावे. यामुळे दही बराच काळ ताजे आणि चवदार राहते.
advertisement
2/5
दही साठवण्यासाठी योग्य कंटेनर वापरा. शक्यतो प्लास्टिक किंवा स्टीलच्या कंटेनरमध्ये दही साठवणं टाळा. कारण यामुळे दह्याची चव आणि गुणवत्ता लवकर बदलू शकते. स्वच्छ काचेच्या कंटेनरमध्ये दही साठवा. काचेच्या कंटेनरमध्ये दही जास्त काळ ताजे, राहते आणि त्याची चव संतुलित राहते.
advertisement
3/5
तासेच कंटेनर नेहमी व्यवस्थजित बंद करावे. दही उघडे ठेवले तर ते हवेच्या आणि ओलाव्याच्या संपर्कात येते, ज्यामुळे ते लवकर आंबट होते. उघडे दही लवकर खराब होते आणि त्याची चव देखील बदलते.
advertisement
4/5
दही आंबट होऊ नये यासाठी काही घरगुती उपायदेखील आहे. दह्याच्या डब्यात सुक्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा टाका. यामुळे दही लवकर आंबट होणार नाही. ही पद्धत सोपी आणि प्रभावी आहे. सुकं खोबरं दह्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि त्याची चव बराच काळ संतुलित ठेवण्यास मदत करते.
advertisement
5/5
हे सगळे उपाय करूनही दही आंबट होत असेल तर त्यामध्ये एक किंवा दोन चमचे उकळलेले दूध घाला. यामुळे दह्याचा आंबटपणा काही प्रमाणात कमी होतो आणि त्याची चव सुधारते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : उन्हाळ्यात दही खूप आंबट होतंय? 'या' टिप्स फॉलो करा, आठवडाभर राहील फ्रेश आणि चवदार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल