TRENDING:

Karan Johar : माय डार्लिंग! करण जोहरने प्रेमाने मारली मिठी, कोण आहे ही नवरी?

Last Updated:
Karan Johar Photo With Bride : करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका नवरीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने नवरीला मिठी मारत माय डार्लिंग असं म्हटलं आहे.
advertisement
1/7
Karan Johar : माय डार्लिंग! करण जोहरने प्रेमाने मारली मिठी, कोण आहे ही नवरी?
बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह असतो. तो काही ना काही पोस्ट करत असतो. नुकतीच त्याने अशी पोस्ट केली आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. करण जोहरचा एका नवरीसोबतचा हा फोटो.
advertisement
2/7
करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका नवरीसोबत फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तो नवरीला प्रेमाने मिठी मारताना दिसला आहे. करणने या फोटोसोबत खास कॅप्शनही लिहिलं आहे.
advertisement
3/7
करण पोस्टमध्ये म्हणाला, "माय डार्लिंग. तुला नवरी बनायची किती हौस होती हे मला माहिती आहे. आता अखेर  तू सगळ्यात आनंदी नवरी बनलीसच. आयुष्यभर असेच एकत्र राहा आणि असंच एकमेकांवर प्रेम करा. तुला आणि रवीला खूप आशीर्वाद. तुझ्यासाठी खूप खूप प्रेम. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर असेल"
advertisement
4/7
करणने पोस्टमध्ये नवरीला टॅग केलं आहे. तिचं नाव आहे एका लखानी. जिचं नुकतंच लग्न झालं आणि या लग्नाला करण जोहर उपस्थित होता.
advertisement
5/7
एका लखानीच्या लग्नाला फक्त करणच नाही तर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात बॉलिवूड आणि स्पोर्टमधील सेलिब्रिटींचाही समावेश होता.
advertisement
6/7
कित्येक सेलिब्रिटी जिच्या लग्नाला आले, ती एका लखानी नेमकी आहे तरी कोण? तर ती एक फॅशन डिझाइनर आहे, सेलिब्रिटी फॅशन डिझाइनर. अनेक सेलिब्रिटींचे ड्रेस तिने डिझाइन केले आहेत.
advertisement
7/7
एका लखानीचं 14 मार्च रोजी लग्न झालं. तिचा नवराही सिनेसृष्टीतीलच आहे. चित्रपट निर्माते रवी भागचंदका यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Karan Johar : माय डार्लिंग! करण जोहरने प्रेमाने मारली मिठी, कोण आहे ही नवरी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल