TRENDING:

RCB च्या स्टारने गुपचूप उरकलं लग्न, वादग्रस्त आरोपांनंतरही पत्नीने दिला पाठिंबा!

Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायच्या आधी आरसीबीच्या वादग्रस्त खेळाडूने लग्न केलं आहे. आरसीबीच्या या स्टार खेळाडूने गुपचूप त्याचं लग्न उरकून टाकलं आहे.
advertisement
1/9
RCB च्या स्टारने गुपचूप उरकलं लग्न, वादग्रस्त आरोपांनंतरही पत्नीने दिला पाठिंबा!
आरसीबीचा फास्ट बॉलर यश दयाळचं कंटेट क्रिएटर श्वेता पुंडीरसोबत लग्न झालं आहे. 4 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत यश दयाळने 7 फेरे घेतले.
advertisement
2/9
क्रिकेटपटू यश दयाळ याच्यावर मागच्या वर्षी 2025 मध्ये लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले होते. गाझियाबादमधल्या एका महिलेने यश दयाळ याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून शारिरिक शोषण केल्याचा आरोप केला. तसंच जयपूरमधल्या एका अल्पवयीन मुलीनेही यश दयाळवर अत्याचाराचा आरोप केला.
advertisement
3/9
राजस्थान हायकोर्टाने याप्रकरणात यश दयाळला जानेवारी महिन्यात अंतरिम दिलासा दिला, यानंतर त्याने हायकोर्टामध्ये वेगळी याचिका दाखल केली. जानेवारी महिन्यात यश दयाळला जामीन मिळाला तेव्हा श्वेताने न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली होती.
advertisement
4/9
28 वर्षांचा यश दयाळ आयपीएल 2026 मध्ये आरसीबीकडून खेळेल. आरसीबीने यश दयाळला 5 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. 2022 साली यश दयाळने गुजरातकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
advertisement
5/9
श्वेता ही व्यावसायिक कंटेट क्रिएटर आहे, इन्स्टाग्रामवर तिचे 6 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम प्रोफाईलवर श्वेताने स्वत:च्या बायोमध्ये क्रिएटर, आर्टिस्ट आणि व्लॉगर असं लिहिलं आहे.
advertisement
6/9
श्वेताने यश दयाळच्या समर्थनामध्ये इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती. यश दयाळवर लावण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचं श्वेता म्हणाली होती.
advertisement
7/9
श्वेता तिच्या युट्युब आणि फेसबुक चॅनलवरही सक्रीय असते. युट्युबवर श्वेता नेहमी तिच्या लाईफस्टाईलचे व्हिडिओ शेअर करते. याशिवाय फेसबुकवरही तिचे एक लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
advertisement
8/9
श्वेताने काहीच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. या रीलशिवाय सोशल मीडियावर यश दयाळसोबत तिचा एकही फोटो किंवा व्हिडिओ नाही, पण तिने यश दयाळबद्दलच्या काही पोस्ट शेअर केल्या आहेत.
advertisement
9/9
श्वेता ही मूळची उत्तराखंडची आहे, पण सध्या दिल्लीमध्ये राहते. श्वेताच्या सोशल मीडिया प्रोफाईलनुसार तिचं शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालं असून ती ग्रॅज्युएट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB च्या स्टारने गुपचूप उरकलं लग्न, वादग्रस्त आरोपांनंतरही पत्नीने दिला पाठिंबा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल