Smriti Mandhana : ब्लू गाऊन, गालावर खळी... BCCI अवॉर्डमध्ये स्मृतीचे घायाळ करणारे 6 Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बीसीसीआयचा नमन पुरस्कार सोहळा पार पडला, ज्यात मागच्या वर्षभरात भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.
advertisement
1/6

बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधनाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी स्मृती निळ्या रंगाचा गाऊन घालून आली होती.
advertisement
2/6
नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये स्मृती मानधनाला दोन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 2024-25 च्या मोसमात सर्वाधिक रन केल्याबद्दल स्मृतीला हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतीने एका मोसमात 36 सामन्यांमध्ये 1800 रन आणि 7 शतकं केली.
advertisement
3/6
सर्वाधिक रनच्या पुरस्कारासोबतच स्मृतीला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं. 2025 हे वर्ष स्मृतीच्या क्रिकेट करिअरसाठी खूपच खास राहिलं, कारण याच वर्षात टीम इंडियाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकला.
advertisement
4/6
बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्मृतीने भारतामधील महिला क्रिकेटच्या विकासाचं कौतुक केलं. अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचंही स्मृतीने अभिनंदन केलं. भारतामध्ये महिला क्रिकेट झपाट्याने विकास करत आहे, याचं श्रेय बीसीसीआयला आहे, असं स्मृती म्हणाली.
advertisement
5/6
भारतीय क्रिकेट टीमकडे सध्या आयसीसीच्या 4 महत्त्वाच्या ट्रॉफी आहेत. 2025 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, यानंतर महिला टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकला. तर अंडर-19 टीमनेही वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. तसंच टी-20 वर्ल्ड कपही टीम इंडियाने जिंकला.
advertisement
6/6
स्मृती मानधनाने भारताकडून 160 टी-20 सामन्यांमध्ये 30.44 ची सरासरी आणि 124.52 च्या स्ट्राईक रेटने 4,231 रन केले. याशिवाय तिच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 120 सामन्यांमध्ये 47.88 च्या सरासरीने 5411 रन आहेत. स्मृतीच्या नावावर वनडेमध्ये 14 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये एक शतक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : ब्लू गाऊन, गालावर खळी... BCCI अवॉर्डमध्ये स्मृतीचे घायाळ करणारे 6 Photo