TV चा शाहरुख खान, एका एपिसोडसाठी घ्यायचा 1.5 लाख, आता काम मिळणंही मुश्किल, 6 वर्षांपासून बेरोजगार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Indian Television Actor : एकता कपूरच्या स्टारला गेल्या 6 वर्षांत कोणतंही काम मिळालेलं नाही. अभिनेत्याने बॉलिवूड निर्मात्यांवर टीका केली.
advertisement
1/8

एके काळी एकता कपूरच्या सीरियलमध्ये लीड रोल करणारा अभिनेता काही काळातच यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याच्या कामामुळे भरपूर ऑफर्स मिळत होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्याचा स्टारडम कमी झाला आणि आता त्याला काम मिळण्याची अडचण सुरू झाली.
advertisement
2/8
अलीकडे प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये या अभिनेत्याने खुलासा केला की, त्याला गेल्या 6 वर्षांत कोणतेही काम मिळालेलं नाही. हा अभिनेता कोण आहे?
advertisement
3/8
हा अभिनेता दुसरा कोणी नसून 'ये है मोहब्बतें'चा स्टार करण पटेल आहे. करण पटेलने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये आपल्या करिअरबद्दल सांगितले की, 'गेल्या 6 वर्षांत मला एकही डेली सोपची ऑफर आलेली नाही. आज रोज 150 ते 200 अभिनेते येतात, जे कमी पैशात काम करायला तयार आहेत. एक काळ होता जेव्हा टेलिव्हिजनमध्ये भरपूर पैसा होता.'
advertisement
4/8
करणने पुढे सांगितले की, 'आजच्या काळात निर्मात्यांना वाटते की एक टीव्ही शो बनवण्यापेक्षा तेवढ्या पैशात दोन वेब सीरीज बनवणे चांगले आहे. पण दर्जा काय? जेव्हा करणला ओटीटीबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने स्पष्ट केले की, तिथूनही त्याला कोणतीही ऑफर मिळालेली नाही. मग ती चांगला असो वा वाईट.'
advertisement
5/8
'आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मही खराब झाले आहेत कारण लोक तिकडे काहीही करत आहेत. अनेक शो असे आहेत ज्यांना सॉफ्ट पॉर्न म्हणता येईल. जर कोणत्याही शोमध्ये लव्ह मेकिंग सीन किंवा इंटिमेट सीन नसेल तर लोक तो शो बघणार नाहीत.'
advertisement
6/8
यावेळी करणने बॉलिवूड निर्मात्यांवरही टीका केली. त्याने सांगितले की, जर एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीत यशस्वी झाली तर सगळे त्याचे अनुकरण करायला लागतात. 'कबीर सिंह' नंतर महिलांना कमी लेखण्याचे ट्रेंड सुरू झाले. तसेच 'एनिमल'च्या बाबतीतही तसेच झाले. 'फॅमिली मॅन'नंतर सगळे तसेच कंटेंट बनवायला लागले. करण त्या काळात इतका लोकप्रिय होता की लोक त्याला टेलिव्हिजनचा शाहरुख खान म्हणायचे.
advertisement
7/8
इतकेच नाही तर धर्मा आणि वायआरएफ ज्यांना रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखले जाते, तेही थ्रिलर्स बनवायला लागले आहेत. करणने सांगितले की, आपल्याकडे काहीतरी वेगळे करण्याची हिंमत नाही. जर साऊथमध्ये काही चालले तर आपण फक्त त्याचे अनुकरण करतो.
advertisement
8/8
'ये है मोहब्बतें' सीरियल खूपच लोकप्रिय झाली होती, ज्यात करण आणि दिव्यांका त्रिपाठी लीड रोलमध्ये होते. रिपोर्ट्सनुसार, त्या काळात या शोच्या एका एपिसोडसाठी करण पटेल 1.5 लाख रुपये मानधन घेत होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV चा शाहरुख खान, एका एपिसोडसाठी घ्यायचा 1.5 लाख, आता काम मिळणंही मुश्किल, 6 वर्षांपासून बेरोजगार