TRENDING:

Kavita Lad : 'काका मला बघून...', कविता लाड यांनी सांगितला लक्षात राहिलेली ती प्रतिक्रिया

Last Updated:
Actress Kavita Lad : तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारणारी मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री कविता लाड यांनी त्यांची नाटकाच्या प्रयोगानंतर चाहत्याकडून आलेली प्रतिक्रिया शेअर केली आहे.
advertisement
1/8
'काका मला बघून...', कविता लाड यांनी सांगितला लक्षात राहिलेली ती प्रतिक्रिया
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने नेहमीच जिंकली आहेत.
advertisement
2/8
कविता लाड यांनी मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'चार दिवस सासूचे' मालिकेमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.
advertisement
3/8
याशिवाय, 'एका लग्नाची गोष्ट' आणि 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकांमधून त्यांनी अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत काम केले. ही नाटकं प्रचंड गाजली आणि कविता यांची प्रशांत दामले यांच्यासोबतची जोडी सुपरहिट ठरली.
advertisement
4/8
अनेक वर्षांनी त्या टेलिव्हिजनवर परतल्या. झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रेक्षकांची आवडती आहे.
advertisement
5/8
कविता लाड यांनी यात भुवनेश्वरी ही खलनायिकेची भूमिका साकारली आहे. जी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे.
advertisement
6/8
नुकतीच मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कविता यांनी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर मिळालेल्या एका खास प्रतिक्रियेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितलं.
advertisement
7/8
त्या म्हणाल्या, "मालिकेचे सुरुवातीचे एक दोन भाग प्रेक्षेपित झाले होते. नाटकाच्या एका प्रयोगाला एक काका मला बघून माघारी फिरले आणि म्हणाले, मी तुमची सगळी नाटकं बघितली आहे. पण अलीकडेच आलेल्या मालिकेतील तुमची भूमिका रुबाब आणि आवाज हे बेअरिग नाटकवाल्यांनाच जमू शकतं."
advertisement
8/8
"ही प्रतिक्रिया भावली. प्रेक्षकांकडून अशा पद्धतीनं दखल घेतली जाते, तेव्हा शाबासकी मिळाल्यासारखं वाटतं", असं कविता लाड म्हणाल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kavita Lad : 'काका मला बघून...', कविता लाड यांनी सांगितला लक्षात राहिलेली ती प्रतिक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल