TRENDING:

'आम्ही भाऊ आहोत हे 5-7 वर्ष माहितच नव्हतं', केदार शिंदेंच्या सख्ख्या लहान भावाचा शॉकिंग खुलासा

Last Updated:
Kedar Shinde Younger Brother Mandar Shinde : प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांना सख्खा लहान भाऊ आहे. पहिल्यांदाच ते समोर आले असून त्यांनी भावाबद्दल शॉकिंग खुलासे केलेत.
advertisement
1/8
'आम्ही भाऊ आहोत हे 5-7 वर्ष माहित नव्हतं', केदार शिंदेंच्या भावाचा शॉकिंग खुलासा
मराठी सिनेसृष्टीतील आताच्या घडीचे काही आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांपैकी एक म्हणजे केदार शिंदे. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी 90 कोटींचा 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा दिला. गेली अनेक वर्ष केदार शिंदे मराठी सिनेक्षेत्रात काम करत आहे.
advertisement
2/8
शाहिर साबळे यांचे नातू असतानाही त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. पण तुम्हाला माहिती आहे केदार शिंदे यांना एक लहान भाऊ देखील आहे. अनेक प्रेक्षकांसाठी ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आली आहे. केदार शिंदे यांना लहान भाऊ असून जन्माच्या 7-8 वर्ष त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांच्या लहान भावानेच याबद्दल सांगितलं.
advertisement
3/8
केदार शिंदे यांचा लहान भाऊ मंदार शिंदे हे देखील मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. पण काही कारणांमुळे ते सध्या इंडस्ट्रीत काम करत नाहीत. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी मोठा भाऊ केदार शिंदे यांच्याबद्दल काही खुलासे केले.
advertisement
4/8
मंदार शिंदे म्हणाले, "लहानपणापासूनच आजोबांच्या घरी माझं जाणं येणं होतं. केदार दादा शाहिरांच्या घरी राहिला. जन्माच्या 10-12 दिवसांनी त्याला तिथे शिफ्ट केला होता. मी माझ्या आईच्या घरी काळाचौकीला अभ्युदय नगरमध्ये जन्माला आलो. इथेच वाढलो."
advertisement
5/8
"या घरात असताना त्या घराची ओढ अशी होती की, आई दररोज मला बाबांच्या परळ विलेजच्या आंबेकर सोसायटीत घेऊन जायची. तिथे केदार दादाही होता. आम्ही शिकायला वेगवेगळे होतो. तो परळला आरएम भट्ट विद्यालयात होता, मी दादरला किंग जॉर्जला होतो. आम्हाला जवळपास पाच सात वर्षे माहिती नव्हतं की आम्ही भाऊ-भाऊ आहोत."
advertisement
6/8
मंदार शिंदे पुढे म्हणाले, "त्याचं सगळं वलय वेगळं, माझं वेगळं. साधारण: पाच सात वर्षांनी त्याला कळलं की ही आपली आई आहे, जी माझी आई आहे ती त्याची आई आहे. तेव्हा त्याला कळलं की मी त्याचा सख्खा भाऊ आहे."
advertisement
7/8
"आमच्यात एक डिस्टन्स कायम होतं. कारण आम्ही राहायला वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या."
advertisement
8/8
"कलागुणांबद्दल बोलायचं झाल्यास, शाहिरांच्या घरी राहिल्याने केदार दादाला संपूर्ण कोर्स मिळाला. मी कधी तरी जाऊन येऊन असल्यामुळे कानावर सूर पडत होते, त्यात माझा गळा थोडा बरा होता. मी गात होतो, गुणगुणत होतो", असंही मंदार शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आम्ही भाऊ आहोत हे 5-7 वर्ष माहितच नव्हतं', केदार शिंदेंच्या सख्ख्या लहान भावाचा शॉकिंग खुलासा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल