TRENDING:

मंदार, डोळे भरून आले..! सख्खा भाऊ राहिला बाजूला, मंदार शिंदेंसाठी किरण माने भावुक

Last Updated:
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा लहान भाऊ दिग्दर्शक मंदार शिंदे अनेक कौटुंबिक अडचणी आणि संघर्षामध्ये अडकले आहेत. टॅलेंट असूनही त्यांना फिल्म इंडस्ट्रीत कोणी काम देत नाहीये. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. त्यांचा संघर्ष ऐकून अभिनेते किरण माने भावुक झालेत.
advertisement
1/7
मंदार, डोळे भरून आले..! सख्खा भाऊ राहिला बाजूला,मंदार शिंदेंसाठी किरण माने भावुक
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे लहान भाऊ मंदार शिंदे पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आले. मंदार यांनीही दिग्दर्शन क्षेत्रात काम केलं आहे. त्यांच्यात टॅलेंट असूनही त्यांना इंडस्ट्रीत हवी तशी संधी मिळाली नाही.
advertisement
2/7
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना मंदार शिंदे यांनी इंडस्ट्रीतील कंपूशाहीचा सामना करावा लागला. काही गटांमध्ये न बसल्यामुळे त्यांना काम नाकारलं गेलं. घरातलेच काम देत नाहीत तर बाहेरचे काय देणार, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. 
advertisement
3/7
मंदार शिंदे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांच्या मुलाचा अपघात. 2019 मध्ये त्यांच्या मुलाला अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यानंतर त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च सुरू आहे. या परिस्थितीत स्थिर उत्पन्नाची गरज असल्याने मंदार यांनी एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हिंगचा जॉब स्वीकारला.
advertisement
4/7
ते आजही मुलाच्या उपचारांसाठी आणि कुटुंबासाठी मेहनत घेत आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी हार मानलेली नाही.
advertisement
5/7
शाहिर साबळे यांचा नातू, केदार शिंदेंसारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा लहान भाऊ असूनही मंदार शिंदे यांच्या आयुष्यातील संघर्ष, आलेल्या अडचणी आणि कुटुंबासाठी सुरू असलेली झुंज ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
advertisement
6/7
अभिनेते किरण माने मंदार शिंदे यांचा संघर्ष आणि कहाणी ऐकून भावुक झाले. त्यांनी सोशल मीडियावर मंदार शिंदेंसाठी पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मंदार शिंदेची मुलाखत पाहिली. अनेक वेळा डोळे भरून आले. आवंढा दाटून आला. पण तो अजूनही जिद्दीने परिस्थितीशी झुंज देतो आहे ती पाहून त्याला मनोमन सलाम ठोकला. मंदार, तू लवकरच सगळ्या संकटातून बाहेर पडणार. आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत."
advertisement
7/7
मंदार आणि केदार शिंदे हे सख्खे भाऊ असले तरी दोघांमध्ये कायम अंतर राहिलं. लहानपणापासून दोघे वेगवेगळ्या घरात आणि वातावरणात वाढले त्यामुळे त्यांच्यात एक अंतर कायम राहिल्याचं मंदार शिंदे यांनी सांगितं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मंदार, डोळे भरून आले..! सख्खा भाऊ राहिला बाजूला, मंदार शिंदेंसाठी किरण माने भावुक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल