किशोरी शहाणेंची मृणाल कुलकर्णींना टक्कर, जिजाऊंच्या भूमिकेतील पहिला Look समोर, तुम्हाला कोण आवडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kishori Shahane jijabai first look : अभिनेत्री किशोरी शहाणे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या जिजाबाई लुकची तुलना अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशी करण्यात आली आहे. तुम्हाला जिजाबाईंच्या भूमिकेत सर्वाता जास्त कोण आवडलं?
advertisement
1/7

छोट्या पडदा असो किंवा मोठा पडदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आजवर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या कलाकृतींमध्ये एक व्यक्तिरेखा कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते ती जिजाऊ आईसाहेबांची.
advertisement
2/7
राजा शिवछत्रपती या टेलिव्हिजन मालिकेपासून ते पावखिंडपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे.
advertisement
3/7
जिजाबाईची भूमिका त्यांनी आजवर उत्तमरित्या वठवली आहे. जिजाबाई म्हटलं की आजही पहिल्यांदा मृणाल कुलकर्णी यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो.
advertisement
4/7
मृणाल कुलकर्णी यांना टक्कर देण्यासाठी अभिनेत्री किशोरी शहाणे सज्ज झाल्या आहेत. किशोरी शहाणे पहिल्यांदा जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
5/7
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा सिनेमा 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किशोरी शहाणे जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
6/7
सिनेमाचं राजं संभाजी’हे टायटल साँग नुकतंच रिलीज झालं आहे. ज्यात किशोरी शहाणे यांचा पहिली लुक पाहायला मिळतोय.
advertisement
7/7
‘राजं संभाजी’ हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
किशोरी शहाणेंची मृणाल कुलकर्णींना टक्कर, जिजाऊंच्या भूमिकेतील पहिला Look समोर, तुम्हाला कोण आवडलं?