TRENDING:

कार्यक्रम असो किंवा सणवार, लता दीदी अन् आशा ताई नेहमी पांढऱ्या साड्याच का नेसायच्या?

Last Updated:
Lata Mangeshkar and Asha Bhosle white Sarees : गानसम्राज्ञी दिवंगत गायिता लता मंगेशकर आणि त्यांची बहिण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची जोडी आजही अजरामर आहे. दोघी बहिणी नेहमी सफेद साडीतच समोर यायच्या. सणवार असो किंवा कार्यक्रम मंगेशकर बहिणी सफेद साडीच का नेसायच्या?
advertisement
1/8
लता दीदी अन् आशा ताई नेहमी पांढऱ्या साड्याच का नेसायच्या?
भारतीय संगीत विश्वात मंगेशकर कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले या बहिणींच्या जोडीने संगीत विश्वाला अनेक हिट गाणी दिली. लता आणि आशा यांची जोडी फार हिट ठरली.
advertisement
2/8
अनेक सिनेमात त्यांनी एकत्र गाणी गायली, अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचं लाइव्ह गाणं ऐकण्याची संधी मिळत असे.
advertisement
3/8
लता आणि आशा कधीही एकत्र समोर आल्या तर त्या सफेद साडीतच. लता आणि आशा भोसले या नेहमी सफेद साडीच का नेसायच्या याचं कारण आशा भोसले यांनी सांगितलं.
advertisement
4/8
अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या 'कपल ऑफ थिंग्ज' या पॉडकास्टमध्ये आशा भोसले यांनी लता दीदींबरोबरच्या नात्याबद्दल आणि पांढऱ्या साडीमागील खास गोष्टी शेअर केल्या.
advertisement
5/8
लता दीदी आणि आशा ताई सुंदर साड्यांमध्ये असत. आजही आशा ताईंच्या साड्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.
advertisement
6/8
दीदींची आठवण सांगत आशा ताई म्हणाल्या, "दीदी (लता मंगेशकर) आणि मी नेहमीच पांढऱ्या साड्या नेसायचो. पांढरा रंग आमच्या त्वचेला जास्त शोभेल असं वाटायचं. जर आम्ही इतर रंग घातले तर आम्ही जास्त गडद दिसायचो."
advertisement
7/8
आशा ताई पुढे म्हणाल्या, "नंतर मी गुलाबी साड्या घालायला सुरुवात केली आणि दीदी माझ्याकडे पाहत राहायची. मग मी हळूहळू गुलाबी रंगाच्या साड्या नेसू लागले."
advertisement
8/8
आशा भोसले यांचे लता दीदींशी खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दीदींनी आशा ताईंना साथ दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कार्यक्रम असो किंवा सणवार, लता दीदी अन् आशा ताई नेहमी पांढऱ्या साड्याच का नेसायच्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल