TRENDING:

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची राजकारणात एन्ट्री? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'धक धक गर्ल'चं मोठं वक्तव्य

Last Updated:
Madhuri Dixit Join Politics : बॉलिवूड अभिनेत्री राजकारणात एन्ट्री करणार असल्याची सध्या चर्चा आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'धक धक गर्ल'ने केलेल्या वक्तव्याने चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/7
माधुरी दीक्षितची राजकारणात एन्ट्री? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर माधुरी दीक्षित आता 'मिसेज देशपांडे' या सीरिजच्या माध्यमातून गाजवण्यास सज्ज आहे. तर दुसरीकडे माधुरी राजकारणात एन्ट्री करणार असल्याचीही चर्चा आहे.
advertisement
2/7
माधुरी दीक्षित 'लोकसभा निवडणूक 2024' लढवणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण त्यावेळी अभिनेत्रीने एका मुलाखतीत निवडणुकिला उभं राहणार नसल्याचं जाहीर केलं. पण आता राजकारणातील एन्ट्रीबाबत माधुरी दीक्षितने स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
advertisement
3/7
ANI ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षित राजकारणातील एन्ट्रीबाबत म्हणाली,"मला नक्की माहिती नाही. मला वाटत नाही की राजकारण माझं काम आहे. मी एक अभिनेत्री आहे आणि अभिनयक्षेत्रात बदल घडवायला मी नक्की प्रयत्न करेन. एखाद्या गोष्टीबाबतची जागृती करणं असो किंवा विचारांचं आदानप्रदाणं करणं. सध्या मी स्वत:ला अशापद्धतीच पाहत आहे".
advertisement
4/7
माधुरी दीक्षित पुढे म्हणाली,"माधुरी दीक्षितची 'मिसेज देशपांडे' ही थ्रिलर-ड्रामा सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागेश कुकुनूर यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजच्या माध्यमातून माधुरी दीक्षित ओटीटीवर पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशू चॅटर्जीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 19 डिसेंबर 2025 रोजी ही सीरिज जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
advertisement
5/7
माधुरी दीक्षित हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'धक धक गर्ल' म्हणून ती ओळखली जाते. दिल, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, अशा अनेक चित्रपटांत माधुरीच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनय आणि नृत्याने माधुरीने चाहत्यांना वेड लावलं आहे. पण बॉलिवूड गाजवणारी माधुरी दीक्षित सध्या तरी राजकारणापासून दूर असल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
6/7
माधुरी दीक्षित रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच प्रयत्न करत असते.
advertisement
7/7
माधुरी दीक्षितचा 'भूल भुलैया 3' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरी कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. माधुरीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची राजकारणात एन्ट्री? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'धक धक गर्ल'चं मोठं वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल