Prathamesh Kadam : मराठमोळा रिलस्टार प्रथमेश कदमला काय झालं होतं? अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
Reel Star Prathamesh Kadam Death : प्रसिद्ध रिलस्टार प्रथमेश कदमने अचानक जगाचा निरोप घेतला. जे सगळ्यांसाठीच शॉकिंग आहे. त्याला असं काय झालं होतं? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
1/5

सोशल मीडिया स्टार प्रथमेश कदमचं अचानक निधन झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. त्याचा मित्र आणि सोशल मीडिया स्टार तन्मय पाटेकरने त्याच्या निधनाची बातमी दिली आणि सगळेच शॉक झाले. कुणाला यावर विश्वासच बसत नाही आहे.
advertisement
2/5
प्रथमेश कदमने सोशल मीडियावर चाहत्यांंचं खूप मनोरंजन केलं आहे. त्याचे भरपूर चाहते आहेत. विशेषत: त्याचे आईसोबतचे व्हिडीओ लोकांना खूप आवडायचे. त्याची आई प्रज्ञा कदमही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. प्रथमेश आणि प्रज्ञा या मायलेकाची जोडी लोकांना खूप हसवत होती. पण आता या स्टार मायलेकाच्या जोडीतील एक स्टार हरपला.
advertisement
3/5
प्रथमेशने 5 जानेवारीला त्याच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर त्याची काही पोस्ट नव्हती आणि अचानक त्याच्या निधनाची बातमी आली. जे सगळ्यांसाठीच शॉकिंग आहे. प्रथमेशला असं काय झालं होतं, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
advertisement
4/5
काही दिवसांपूर्वी प्रथमेशने त्याचे हॉस्पिटलमधील व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हॉस्पिटलमध्ये या अवस्थेतही तो लोकांचं मनोरंजन करत होता.
advertisement
5/5
त्यानंतरही त्याच्या सोशल मीडियावर काही पोस्ट आहेत. प्रथमेश हॉस्पिटलमध्ये हा होता, त्याला नेमकं काय झालं हे माहिती नाही. त्याच्या मृत्यूचं कारण काय, हे अद्याप माहिती नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prathamesh Kadam : मराठमोळा रिलस्टार प्रथमेश कदमला काय झालं होतं? अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का