संजू सॅमसन की ईशान किशन? तिलक वर्मा संघात आल्यावर कुणाचा होणार पत्ता कट? मोठी भविष्यवाणी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ishan Kishan vs Sanju Samson : तिलक वर्मा तर कमबॅक करेल आणि जागा देखील फिक्स करेल. पण दुसरीकडे यावर माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठं भाष्य केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या मते, तिलक वर्मा संघात परतल्यानंतर ईशान किशनला बाहेर बसावे लागेल.
advertisement
1/7

भारतीय क्रिकेट संघात सध्या ईशान किशनच्या पुनरागमनाची आणि त्याच्या जबरदस्त फॉर्मची मोठी चर्चा सुरू आहे. त्याने ज्या धडाक्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. त्यामुळं त्याला संघातून बाहेर ठेवणंही अशक्य झालंय.
advertisement
2/7
ईशान किशनच्या जबरदस्त फॉर्ममुळे टी20 वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ईशान सातत्याने धावा करत असताना, सॅमसनला मात्र आपली लय सापडलेली नाही.
advertisement
3/7
संजू सॅमसनसाठी ही मालिका आतापर्यंत अत्यंत खराब ठरली असून तिसऱ्या मॅचमध्ये तो चक्क 'गोल्डन डक'चा शिकार झाला. पहिल्या दोन सामन्यांमध्येही त्याने केवळ 10 आणि 6 रन्स केल्या होत्या.
advertisement
4/7
अशातच तिलक वर्मा संघात परतल्यावर प्लेइंग 11 मधून कोणाचा पत्ता कट होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन्ही विकेटकीपर पैकी एकाला बाहेर बसावं लागणार आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय.
advertisement
5/7
तिलक वर्मा तर कमबॅक करेल आणि जागा देखील फिक्स करेल. पण दुसरीकडे यावर माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठं भाष्य केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या मते, तिलक वर्मा संघात परतल्यानंतर ईशान किशनला बाहेर बसावे लागेल.
advertisement
6/7
जरी संजूने धावा केल्या नसल्या तरी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार त्यालाच पसंती देतील. संजूकडे असलेली क्वालिटी पाहता त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कधीकधी खराब कामगिरी होते, पण अशा वेळी खेळाडूला बॅक करणं गरजेचं असतं, असं रहाणे म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान, अभिषेक शर्मासोबत तुलना करण्याची गरज नाही. मैदानावर जाऊन फक्त स्वतःला एक्सप्रेस केल्यास संजू पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल, असं म्हणत अजिंक्य रहाणे याने विजयाचा मंत्र सांगितला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
संजू सॅमसन की ईशान किशन? तिलक वर्मा संघात आल्यावर कुणाचा होणार पत्ता कट? मोठी भविष्यवाणी!