TRENDING:

Manasi Naik : कितीही लपवून लपलं नाही प्रेम; अखेर समोर आलाच मानसी नाईकच्या 'त्या' स्पेशल व्यक्तीचा फोटो!

Last Updated:
आपल्या नृत्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आली आहे. मानसी नाईकनं काही दिवसांपूर्वीच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. आता ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा सुरु असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो समोर आला आहे.
advertisement
1/8
लपवून लपलं नाही प्रेम; अखेर समोर आलाच मानसी नाईकच्या त्या स्पेशल व्यक्तीचा फोटो
आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. काही महिन्यांपूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला. आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
2/8
अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
advertisement
3/8
मानसी तिच्या वाढदिवशी पॅरिसला पोहोचली होती. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथे तिच्यासोबत नक्की कोण होतं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याविषयी लवकरच खुलासा करणार असल्याचं मानसीने म्हटलं होतं.
advertisement
4/8
आता मानसीसोबत पॅरिसमध्ये नक्की कोण होतं त्याचा फोटो समोर आला आहे. नुकतंच मानसीने या व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
5/8
मानसी पॅरिसमध्ये राहुल खिसमत्रो या व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होती. राहुल एक अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तो भारतात राहत नाही.
advertisement
6/8
राहुलने आयफेल टॉवरसमोर मानसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं 'माझं प्रेम' असं म्हटलं आहे.
advertisement
7/8
त्यानंतर आता मानसी नाईक लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जातं.
advertisement
8/8
तसंच मानसी लग्नानंतर भारतात नाही जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचंही ती म्हणाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Manasi Naik : कितीही लपवून लपलं नाही प्रेम; अखेर समोर आलाच मानसी नाईकच्या 'त्या' स्पेशल व्यक्तीचा फोटो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल