नवी कोरी मर्सिडिज घेऊन अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला पोहोचली मराठी अभिनेत्री, नवऱ्याचं Mumbai Indiansशी खास कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात पोहोचली. नव्या कोऱ्या मर्सिडिजमधून तिनं लग्नाला हजेरी लावली.
advertisement
1/10

भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजे अर्जुन तेंडुलकरचं नुकतंच लग्न झालं. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा लग्नसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला.
advertisement
2/10
ऑगस्ट महिन्यात अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासूनच दोघांचं लग्न कधी आहे याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अर्जुन आणि सानिया यांचे लग्नाआधीचेही सगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
advertisement
3/10
या लग्नाला क्रिकेट विश्वातील तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यात एक मराठी अभिनेत्रीही पाहायला मिळाली. तिच्या नवऱ्याबरोबर ती अर्जुन आणि सानियाच्या लग्नाला पोहोचली होती. अभिनेत्रीचं मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत खास कनेक्शन आहे.
advertisement
4/10
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे काजल काटे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिनं साकारलेली शेफाली प्रेक्षकांना आवडली.
advertisement
5/10
काजल तिचा नवरा प्रतीक कदमसोबत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला हजर होती. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही याबाबत उत्सुकता निर्माण झाली.
advertisement
6/10
काजल काटेचा नवरा प्रतिक कदम हा आयपीएलमधील प्रसिद्ध संघ Mumbai Indiansचा फिटनेस ट्रेनर आहे.
advertisement
7/10
या कनेक्शनमुळेच त्याला अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं खास आमंत्रण मिळालं होतं. काजल आणि प्रतीक दोघेही या भव्य लग्नसोहळ्यात सहभागी झाले.
advertisement
8/10
लग्नसोहळ्याला जाताना या दोघांची स्टाईलही चर्चेत आली. कारण लग्नाआधीच प्रतीक कदमने तब्बल 30 लाख रुपयांची Mercedes-Benz B180 ही आलिशान कार खरेदी केली होती.
advertisement
9/10
नव्या गाडीमध्येच हे दोघे लग्नसमारंभाला पोहोचल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सोशल मीडियावर या कपलचीही चर्चा रंगली आहे.
advertisement
10/10
अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक ही मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक रवी घई यांची नात आहे. सानिया स्वतःही एक यशस्वी उद्योजिका आहे. Mr. Paws नावाच्या पेट स्पा आणि स्टोअरची ती संचालिका आहे. व्यवसाय क्षेत्रात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नवी कोरी मर्सिडिज घेऊन अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला पोहोचली मराठी अभिनेत्री, नवऱ्याचं Mumbai Indiansशी खास कनेक्शन