T20 World Cup : वनडे वर्ल्ड कपचे 2 खेळाडू पुन्हा फायनलमध्ये, अहमदाबादमध्येच विराट-रोहितचं अधूरं स्वप्न पूर्ण करणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी थरारक विजय मिळवला. भारताने दिलेलं 254 रनचं आव्हान पार करायला आलेल्या इंग्लंडने 246 रनपर्यंत मजल मारली.
advertisement
1/6

सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
advertisement
2/6
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. याआधी 2023 वनडे वर्ल्ड कपची फायनलही अहमदाबादमध्येच झाली होती, पण या सामन्याच्या कटू आठवणी आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्रास देतात.
advertisement
3/6
2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात ढसाढसा रडले होते. ही वर्ल्ड कप फायनल खेळलेले दोन खेळाडू टी-20 वर्ल्ड कपची फायनलही खेळतील.
advertisement
4/6
इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव हे 7 खेळाडू 2023 वनडे वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये होते, जे आता भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीमचाही भाग आहेत.
advertisement
5/6
वनडे वर्ल्ड कपची फायनल खेळलेले दोन जणच अहमदाबादमध्ये टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील. बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे वनडे वर्ल्ड कपची फायनल खेळले होते. सूर्याने वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये 28 बॉल 18 रन केले होते, तर बुमराहने 9 ओव्हरमध्ये 43 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
6/6
सध्या टीम इंडियाचा भाग असलेले मोहम्मद सिराज, कुलदीप यादव हे 2023 वनडे वर्ल्ड कपची फायनल खेळले होते, पण आता टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या दोघांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वनडे वर्ल्ड कपचे 2 खेळाडू पुन्हा फायनलमध्ये, अहमदाबादमध्येच विराट-रोहितचं अधूरं स्वप्न पूर्ण करणार!