TRENDING:

Tooth : अक्कलदाढ येताना असह्य वेदना का होतात? शरीरात या दाढेचं काम तरी काय? जाणून घ्या यामागचं रंजक विज्ञान

Last Updated:
कधी विचार केलाय का की, जी दाढ आपल्याला एवढ्या वेदना देते, तिचं आपल्या शरीरात नेमकं काम काय? जर ती फक्त त्रास देते, तर निसर्गाने ती आपल्याला दिलीच का आणि डॉक्टर ती काढून टाकण्याचा सल्ला का देतात? चला, यामागचं वैज्ञानिक गुपित उलगडूया.
advertisement
1/8
अक्कलदाढ येताना असह्य वेदना का होतात? शरीरात या दाढेचं काम तरी काय? जाणून घ्या
आपल्या आयुष्यात 17 ते 25 हे वय असं असतं, जेव्हा आपण करिअरची स्वप्नं रंगवत असतो, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. पण याच वयात अनेकांना एका विचित्र त्रासाचा सामना करावा लागतो, तो म्हणजे 'अक्कलदाढ' (Wisdom Tooth). कोणाचे हिरडे सुजतात, तर कोणाला तोंड उघडणंही कठीण होतं. गंमत म्हणजे, या दाढेचा 'अक्कल' किंवा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतो, तरीही तिला अक्कलदाढ म्हणतात कारण ती आपण समजूतदार होण्याच्या वयात येते.
advertisement
2/8
पण कधी विचार केलाय का की, जी दाढ आपल्याला एवढ्या वेदना देते, तिचं आपल्या शरीरात नेमकं काम काय? जर ती फक्त त्रास देते, तर निसर्गाने ती आपल्याला दिलीच का आणि डॉक्टर ती काढून टाकण्याचा सल्ला का देतात? चला, यामागचं वैज्ञानिक गुपित उलगडूया.
advertisement
3/8
काय असते ही अक्कलदाढ?वैद्यकीय भाषेत याला 'थर्ड मोलर' (Third Molar) असं म्हणतात. आपल्या तोंडातील सर्वात शेवटी येणारा हा दातांचा संच असतो. काहींना या दाढा अजिबात त्रास न देता व्यवस्थित येतात, पण बहुतेकांच्या बाबतीत त्या हिरड्यांमध्ये किंवा हाडामध्ये अडकून बसतात. जेव्हा जबड्यात या दाढेसाठी पुरेशी जागा नसते, तेव्हा ती वेडीवाकडी येऊ लागते, ज्याला 'इम्पॅक्टेड विजडम टूथ' असं म्हणतात.
advertisement
4/8
शरीरात याचं काम काय?जर आज या दाढेचा फारसा उपयोग वाटत नसेल, तर आपल्या पूर्वजांसाठी ती 'वरदान' होती. त्या काळी मानवाचा आहार आजच्यासारखा मऊ किंवा शिजवलेला नव्हता. आपले पूर्वज कच्चे मांस, कडक मुळं आणि कठीण फळं खायचे. हे अन्न नीट चावण्यासाठी आणि बारीक करण्यासाठी जबड्याच्या शेवटी अतिरिक्त ताकदीची गरज होती. त्या काळी मानवाचे जबडेही आजच्या तुलनेत मोठे असायचे, त्यामुळे या दाढांना तिथे पुरेशी जागा मिळायची.
advertisement
5/8
क्लीव्हलँड क्लिनिक (Cleveland Clinic) या प्रसिद्ध आरोग्य संस्थेनुसार, मानवाची उत्क्रांती झाली तसा आपला आहार बदलला. आपण अन्न शिजवून खायला लागलो, ज्यामुळे ते मऊ झालं. परिणामी, मानवी जबड्याचा आकार पिढ्यानपिढ्या लहान होत गेला. पण दाढांची संख्या मात्र तितकीच राहिली. आज आपल्या लहान जबड्यात या मोठ्या दाढेसाठी जागाच उरली नाहीये, म्हणूनच ती 'समस्या' बनली आहे.
advertisement
6/8
अक्कलदाढेचे प्रकार आणि येणारे अडथळेसामान्यतः माणसाला चार अक्कलदाढा येतात (वर दोन आणि खाली दोन). पण प्रत्येकाला चारही येतीलच असं नाही. जेव्हा दाढ बाहेर येण्यासाठी धडपडते पण जागा नसल्यामुळे ती शेजारच्या दाताला धक्का लावते, तेव्हा तीव्र वेदना आणि सूज येते. अर्धी बाहेर आलेली दाढ स्वच्छ करणं कठीण असतं, ज्यामुळे तिथे अन्नाचे कण अडकतात आणि कॅव्हिटी किंवा इन्फेक्शन होतं.
advertisement
7/8
काढून टाकणे हाच एकमेव पर्याय?जर तुमची अक्कलदाढ सरळ आली असेल आणि ती स्वच्छ करणं सोपं असेल, तर ती काढण्याची गरज नसते. पण जर ती सतत दुखत असेल, हिरड्यांतून पू येत असेल किंवा इतर दातांना इजा पोहोचवत असेल, तर दंतवैद्य ती काढून टाकण्याचा (Extraction) सल्ला देतात. ही प्रक्रिया लोकल ॲनेस्थेशिया देऊन केली जाते आणि ती पूर्णपणे सुरक्षित असते.
advertisement
8/8
अक्कलदाढ हे मानवी उत्क्रांतीचं एक अवशेष आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे तिची उपयुक्तता संपली असली तरी, तिच्या येण्याने होणारा त्रास दुर्लक्षित करू नका. जर तुम्हालाही दाढदुखीचा त्रास होत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tooth : अक्कलदाढ येताना असह्य वेदना का होतात? शरीरात या दाढेचं काम तरी काय? जाणून घ्या यामागचं रंजक विज्ञान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल