TRENDING:

Team India : कॅप्टन सूर्यामुळेच स्वप्नभंग... वर्ल्ड कप पुन्हा हातातून जाणार? फायनलआधी अख्खी ड्रेसिंग रूम पॅनिक!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध 7 रननी थरारक विजय झाला. या विजयासोबतच टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
advertisement
1/8
कॅप्टन सूर्यामुळेच स्वप्नभंग... वर्ल्ड कप हातातून जाणार? ड्रेसिंग रूम पॅनिक!
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. रविवार 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. हा सामना जिंकला तर लागोपाठ 2 टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच ठरेल.
advertisement
2/8
न्यूझीलंडसमोर टीम इंडिया मजबूत दिसत असली तरी या सामन्याआधी काही खेळाडूंच्या कामगिरीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे.
advertisement
3/8
अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरूवात मिळत नाहीये. तर मिस्ट्री स्पिनर असलेल्या वरुण चक्रवर्ती याच्यावर विरोधी टीमचे बॅटर आक्रमण करत आहेत, ज्यामुळे टीम इंडियाला मधल्या ओव्हरमध्ये विकेट मिळत नाहीयेत.
advertisement
4/8
अभिषेक आणि वरुण फॉर्ममध्ये नसले तरी टीम इंडियासाठी सगळ्यात जास्त चिंतेचा विषय हा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा आयसीसीच्या नॉक आऊट स्पर्धांमधला फॉर्म आहे. सूर्यकुमार यादव आतापर्यंत आयीसीसी स्पर्धांमध्ये 6 नॉक आऊटचे सामने खेळला, ज्यात त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
advertisement
5/8
2022 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सूर्याने 10 बॉल 14 रन केले, तर 2024 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सूर्याने 36 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली. 2024 टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सूर्या 4 बॉलमध्ये 3 रन करून आऊट झाला. तर या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये सूर्या 6 बॉलमध्ये 11 रन करून माघारी परतला.
advertisement
6/8
2023 वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सूर्या 2 बॉलमध्ये 1 रन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये 28 बॉलमध्ये 18 रन करून आऊट झाला. सूर्यकुमार यादव हा त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत आयसीसी स्पर्धांच्या 6 नॉक आऊट मॅच खेळला आहे, ज्यात त्याला फक्त 94 रन करता आल्या आहेत.
advertisement
7/8
सूर्यकुमार यादवचं आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये एकही अर्धशतक नाही. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी करो या मरो चा म्हणजे नॉक आऊट सारखाच होता, पण यातही सूर्याने 16 बॉलमध्ये फक्त 18 रन केले.
advertisement
8/8
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याचा आयसीसी नॉक आऊट सामन्यांमधला हा इतिहास बदलून मोठी खेळी करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : कॅप्टन सूर्यामुळेच स्वप्नभंग... वर्ल्ड कप पुन्हा हातातून जाणार? फायनलआधी अख्खी ड्रेसिंग रूम पॅनिक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल