TRENDING:

कुटुंब सुरक्षित ठेवायचंय? या आहेत भारतातील 10 सर्वात सेफ कार, पाहा लिस्ट

Last Updated:
भारतात आता कार खरेदी करताना सेफ्टीला प्राधान्य दिलं जातं. टाटा आणि महिंद्रा सारख्या कंपन्यांनी सेफ्टीच्या बाबतीत ग्लोबल स्टँडर्ड स्थापित केले आहेत. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/10
कुटुंब सुरक्षित ठेवायचंय? या आहेत भारतातील 10 सर्वात सेफ कार, पाहा लिस्ट
टाटा सफारी : ही भारतातील सर्वात सुरक्षित SUVs मधून एक आहे. या कारला Bharat NCAP आणि Global NCAP दोन्हीकडून 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. यामध्ये 7 एयरबॅग्स, ADAS (एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम) आणि ऑटोनॉमस इमरर्जेंसी ब्रेकिंग सारखे फीचर्स मिळतात. ही कुटुंबासाठी मजबूत आणि प्रीमियम ऑप्शन आहे.
advertisement
2/10
टाटा हॅरियर (Tata Harrier): सफारी प्रमाणे हॅरियरनेहे सेफ्टीच्या बाबतीत उत्कृष्ट आहे. याची मजबूत बॉडी शेल आणि ओमेगा-आर्क प्लॅटफॉर्म या कारला दुर्घटनांपासून सुरक्षित बनवते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्च स्टँडर्ड मिळतात. जे याला खडबडीत रस्त्यांसाठी बेस्ट बनवतात.
advertisement
3/10
महिंद्रा एक्सयूव्ही700 (Mahindra XUV700): महिंद्राची ही फ्लॅगशिप एसयूव्ही टेक्नॉलॉजी आणि सुरक्षेचा अतुलनीय संयोजन आहे Global NCAP मध्ये 5-स्टार स्कोअर करणाऱ्या या कारमध्ये लेव्हल-2 ADAS दिला आहे. जो रडार आणि कॅमेराच्या मदतीने टक्कर रोखण्यात सक्षम आहे. यामध्ये नी एयरबॅगसह एकूण 7 एयरबॅग्सची सुरक्षा मिळते. कंपनीने नुकतेच याच्या अपडेटेड व्हर्जन XUV 7XO ही लॉन्च केले आहे.
advertisement
4/10
फोक्सवॅगन व्हर्टस: तुम्ही सेडानचे चाहते असाल, तर व्हर्टस हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. प्रौढ आणि मुलांच्या संरक्षणासाठी याला 5-स्टार रेटिंग आहे. त्याची जर्मन इंजीनियरिंग आणि मजबूत फ्रेम उच्च वेगाने देखील ती स्थिर ठेवते. यात मल्टी-कोलिजन ब्रेकिंग आणि सहा एअरबॅग्ज सारखी फीचर्स देखील समाविष्ट आहेत.
advertisement
5/10
स्कोडा स्लाविया (Skoda Slavia):वर्ट्स प्रमाणे स्कोडालाही स्लावियाही 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. ही कार चांगली बिल्ड क्वालिटी आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) सह येते. स्लाविया अशा लोकांसाठी बेस्ट आहे. ज्यांना लग्जरीसोबत कुटुंबाच्या सुरक्षेसोबत कॉम्प्रमाईज करायचे नाही.
advertisement
6/10
ह्युंदाई व्हेर्न: नवीन पिढीतील ह्युंदाई व्हेर्नाने 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता ती सहा एअरबॅग्जसह स्टँडर्ड म्हणून येते. याव्यतिरिक्त, ह्युंदाई स्मार्टसेन्स (ADAS) फीचर महामार्गावर ड्रायव्हिंग करताना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. त्याची रचना आणि सेफ्टी तिला एक संपूर्ण पॅकेज बनवतात.
advertisement
7/10
मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire): मारुतीने सेफ्टीच्या बाबतीत नवीन डिझायरसह मोठं कमबॅक केलंय. ही मारुतीची पहिली अशी कार आहे. जिला Global NCAP ने 5-स्टार रेटिंग दिली आहे. यामध्ये 6 एयरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फीचर्स मिळतात. ज्यामुळे ती बजेट सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित सेडान बनते.
advertisement
8/10
महिंद्रा स्कॉर्पियो-एन (Mahindra Scorpio-N):'बिग डॅडी ऑफ एसयूव्ही' म्हटली जाणारी स्कॉर्पियो-एन सेफ्टीमध्येही मागे नाही. ती Global NCAP च्या नव्या आणि कठोर नियमांअंतर्गत 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. याची लॅडर-फ्रेम चेसिस आणि मजबूत बनावट या कारला प्रत्येक प्रकारच्या रस्त्यांवर सुरक्षित ठेवते. ही मजबूती आणि सुरक्षेचे खरे मिश्रण आहे.
advertisement
9/10
टाटा नेक्सॉन (Tata Nexon): टाटा नेक्सॉन ही भारतातील पहिली 5-स्टार रेटिंग असलेली कार होती आणि अजूनही ती सर्वोच्च दर्जाची आहे. नवीन मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्ज आणि 360-डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टम सारख्या फीचर्सचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नेक्सॉन ही एक सर्वोच्च निवड आहे.
advertisement
10/10
टाटा पंच ईव्ही (Tata Punch.ev): देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्हीला Bharat NCAP ने 5-स्टार रेटिंग दिली आहे. ही इलेक्ट्रिक मायक्रो-एसयूव्ही फक्त पर्यावरणासाठी अनुकूल नाही. तर सुरक्षेच्या बाबतीतही मोठ्या कारला टक्कर देते. यामध्ये ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि डिस्क ब्रेक्ससारखे प्रीमियम सेफ्टी फीचर्स मिळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
कुटुंब सुरक्षित ठेवायचंय? या आहेत भारतातील 10 सर्वात सेफ कार, पाहा लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल