T20 World Cup : फायनलआधी ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा, सू्याने डोकं पकडलं, 'या' तीन चूका अहमदाबादमध्ये पुन्हा रडवणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
फायनलचा सामना हा आता येत्या 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.या सामन्यात न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ भिडणार आहेत.
advertisement
1/9

मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडला 7 धावांनी हरवून टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचली आहे.
advertisement
2/9
फायनलचा सामना हा आता येत्या 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.या सामन्यात न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ भिडणार आहेत.
advertisement
3/9
फायनलचा सामना जिंकणे सू्र्या ब्रिगेडशी सोप्पे नसणार आहे. कारण न्यूझीलंडच्या टीमला हलक्यात घेणे टीम इंडियाला महागात पडू शकते.
advertisement
4/9
दरम्यान या सामन्याआधी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा पसरला आहे. कारण कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला तीन गोष्टींची भीती सतावत आहे. या तीन गोष्टी नेमक्या काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
5/9
v
advertisement
6/9
वरूण चक्रवर्तीने 4 ओव्हरमध्ये 16 च्या रनरेटने 64 धावा दिल्या होत्या. तर अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये 11 च्या रनरेटने 35 धावा दिल्या होत्या. याचा अर्थ सपाट पिचवर टीम इंडियाची गोलंदाजी चालत नाही आहे.त्यामुळे बुमराह वगळता बॉलिंगने मॅच जिंकवणारा टीम इंडियाकडे एकही गोलंदाज नाही आहे.त्यामुळे यावर सूर्या काय तोडगा काढणार? हे पाहावे लागणार आहे.
advertisement
7/9
अहमदाबादची रिंग ऑफ लाईटस खेळाडूंना फिल्डींग करताना नेहमी आव्हान निर्माण करतात. भारताने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 13 कॅच ड्रॉप केल्या आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूकडून सुधाराची अपेक्षा आहे. पण जर फायनलमध्ये एकही मिस फिल्ड झाली तर हातातून मॅच जाऊ शकते.
advertisement
8/9
तिसरी गोष्ट म्हणजे भारतासाठी संकटमोचक कोण बनणार? विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर टीम इंडियात संकटमोचकची भूमिका निभावणारा खेळाडू तयार झाला नाही आहे. अभिषेक शर्मा सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. तर सूर्या युएसए विरूद्ध खेळी वगळता कुठल्याच सामना फारसा चालला नाही.रिंकूही अपयशी ठरतो आहे. त्यामुळे टीम इंडियाला मॅच कोण जिंकवून देणार आहे? हा मोठा प्रश्न आहे.
advertisement
9/9
दरम्यान या तीन गोष्टींवर जर टीम इंडियाने सुधार केला नाही तर त्यांच्या हातून वर्ल्डकप फायनलची ट्रॉफी जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : फायनलआधी ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा, सू्याने डोकं पकडलं, 'या' तीन चूका अहमदाबादमध्ये पुन्हा रडवणार