TRENDING:

माजिवाडा फ्लायओव्हरवर बंद पडली मराठी अभिनेत्रीची कार, स्कूटीवर आली अनोळखी व्यक्ती अन्... सांगितलं काय घडलं

Last Updated:
मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे जीवघेणं असतं असं म्हणतात. या ट्रॅफिकमध्ये चुकून जर गाडी बंद पडली तर... प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत असंच काहीस घडलं. अभिनेत्री मीरा जोशीबद्दल आपण बोलत आहोत. मीराची गाडी ठाण्याच्या माजिवाडा ब्रिज फ्लायओव्हरवर बंद पडली. भयंकर ट्रॅफिकमध्ये मीराची गाडी बंद पडली. मीराने तिचा हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
advertisement
1/7
माजिवाडा फ्लायओव्हरवर बंद पडली मराठी अभिनेत्रीची कार...
"मानवता अजून जिवंत आहे", असं म्हणत मीराने पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहिलंय, "काल संध्याकाळी पीक ट्रॅफिकच्या वेळी माझी गाडी माजिवडा ब्रिज फ्लायओव्हरवर बंद पडली. थोडा वेळ थांबून काय करावं हे बघितलं आणि कशीबशी गाडी बाजूला एका लेनमध्ये ढकलली. पण गाडी सुरूच होत नव्हती. बाजूनं जाणारे सगळे लोक माझ्याकडे रागानं बघत होते."
advertisement
2/7
"अडचणीत मी एका दुचाकीस्वाराला मदतीसाठी हाक मारली. तो थांबला, माझ्यासोबत गाडी तपासली आणि आम्हाला संशय आला की पेट्रोल टाकीला गळती लागली असून त्यामुळे पेट्रोल खाली उतरतंय. त्यानं अजिबात वेळ न घालवता पेट्रोल आणतो असं सांगितलं, जेणेकरून गाडी गॅरेजपर्यंत नेता येईल."
advertisement
3/7
"काही वेळानं मला वाटलं तो परत येणार नाही. मग काही मॅकेनिक्सना फोन केले. त्यापैकी एकानं अर्ध्या तासानं येतो सांगितलं. त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, अनेक ट्रक ड्रायव्हर्स आणि काही वयस्कर कारचालक मदतीसाठी थांबले. त्यांच्या या कृतीतून अनोळखी लोकांची दयाळुता जाणवली. पण काही तरुण मात्र शिवीगाळ करत होते, कारण माझ्या गाडीमुळे ट्रॅफिक जाम झाला होता."
advertisement
4/7
मीराने पुढे लिहिलंय, "याचवेळी मुंबई पोलीस आले. मी त्यांना ट्रॅफिक जाम झाल्याबद्दल माफी मागितली. पण ते शांतपणे म्हणाले, 'मशीन आहे, कधीही बंद पडू शकतं. यात माफी मागायचं कारण नाही.' त्यांच्या या समजूतदार आणि सहानुभूतीपूर्ण उत्तरामुळे माझं मन हलकं झालं. त्यांच्या जलद प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे."
advertisement
5/7
"ते गाडी खाली ढकलायला मदत करणार इतक्यात तो अनोळखी दुचाकीस्वार मोठा पेट्रोलचा कॅन घेऊन परत आला. त्याला पाहून मला प्रचंड आनंद झाला आणि त्याच्या या अनपेक्षित मदतीबद्दल मी मनापासून कृतज्ञ झालो."
advertisement
6/7
"पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पटकन समस्या सोडवली आणि ब्रिज मोकळा केला. त्याच्या मागून मी गाडी चालवत गेले आणि नीट आभार मानले. त्याने आणलेल्या पेट्रोलचे पैसे दिले आणि अतिरिक्त पैसेही द्यायचा प्रयत्न केला, पण तो हसतच नकार देऊन निघून गेला."
advertisement
7/7
मीरा शेवटी म्हणाली, "मुंबई पोलिसांचे खूप आभार! तुमची सहानुभूती, समजूतदारपणा आणि जलद प्रतिसाद खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्या दयाळू दुचाकीस्वाराचे मनःपूर्वक आभार! तुमच्या निस्वार्थी कृतीनं माझा मानवतेवरचा विश्वास पुन्हा दृढ केला. तुमची उदारता आणि मदत आदर्श आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माजिवाडा फ्लायओव्हरवर बंद पडली मराठी अभिनेत्रीची कार, स्कूटीवर आली अनोळखी व्यक्ती अन्... सांगितलं काय घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल