राणा दा-पाठकबाई ते देवमाणूस, या मराठी कलाकारांची मालिकेच्या सेटवर जुळली रेशीमगाठ!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Celebrity Wedding : मराठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकार मालिकेच्या शूटिंगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले असून लग्नबंधनातही अडकले आहेत.
advertisement
1/7

एकाच मालिकेत एकत्र काम करताना अनेकदा कलाकारांमध्ये छान मैत्री होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत. अशाच काही जोड्या आपण पाहणार आहोत, जे एकाच मालिकेत काम करत होते व नंतर ते खऱ्या आयुष्याचे जोडीदार बनले.
advertisement
2/7
'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवणारा किरण गायकवाड आणि 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली वैष्णवी कल्याणकर यांनी 14 डिसेंबर 2024 रोजी लग्नगाठ बांधली होती.
advertisement
3/7
'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव लवकरच आपल्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री अनुष्का पिंपूटकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रेमाची कबुली दिली आहे.
advertisement
4/7
'बिग बॉस मराठी 4'मध्ये प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांसोबत संसार थाटला.
advertisement
5/7
संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी 'दुहेरी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. 2023 मध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली.
advertisement
6/7
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा विजय आंदळकर आणि रूपाली झनकर यांनी कोरोनाकाळात लग्न केलं. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं.
advertisement
7/7
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या लग्नबंधनात अडकले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राणा दा-पाठकबाई ते देवमाणूस, या मराठी कलाकारांची मालिकेच्या सेटवर जुळली रेशीमगाठ!