TRENDING:

'तारक मेहता'ची बबीता कोट्यवधींची मालकीण, एका एपिसोडसाठी किती घेते पैसे?

Last Updated:
Munmun Dutta Net Worth : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय कार्यक्रमातील बबीता जी अर्थात मुनमुन दत्ता एका एपिसोडसाठी किती मानधन घेते? अभिनेत्रीचं नेटवर्थ किती जाणून घ्या...
advertisement
1/7
'तारक मेहता'ची बबीता कोट्यवधींची मालकीण, एका एपिसोडसाठी किती घेते पैसे?
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून मुनमुन दत्ता घराघरांत पोहोचली आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या बबीता जी या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. जेठालालसोबतची तिची केमिस्ट्री मालिकाप्रेमींच्या पसंतीस उतरते.
advertisement
2/7
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर 18.5 फॉलोअर्स आहेत. आपला ग्लॅमरस लुक आणि अभिनयाने ती लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
advertisement
3/7
मुनमुन दत्ताने इंग्रजी विषयात मास्टर केलं आहे. कोलकातातील आकाशवाणी आणि दूरदर्शनवर तिने बालकलाकार म्हणून काम केलंय. मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरुवात 2004 मध्ये केली. 'मुंबई एक्सप्रेस' हा तिचा पहिला सिनेमा. यानंतर हॉलिडे,अमर अकाशे, मेघ बृष्टि आणि द लिटिल गॉडेस या चित्रपटांत मुनमुन झळकली.
advertisement
4/7
मिडिया रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील एका एपिसोडसाठी बबीता जी अर्थात मुनमुन दत्ता 50,000 ते 75,000 मानधन घेते. 2021 मध्ये मुनमुन दत्ताची संपत्ती 29 कोटी रुपये होती. तर 2025 मध्ये तिचं एकूण नेटवर्थ 40 कोटी रुपये झालं.
advertisement
5/7
मुनमुन दत्ता अभिनयाव्यतिरिक्त मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तगडी कमाई करते. मुनमुनचं मुंबईत स्वत:चं घर आहे. या घराची किंमत 1.80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मुनमुन सोशल मीडियावर आपल्या आलिशान घराचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये बेंज ए-क्लास लिमोसिन, टोयोटा इनोवा आणि मारुती सुजुकी या गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
6/7
मुनमुन दत्ता अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मुनमुन आपला सहकलाकार राज अनादकटला डेट करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून चांगलीच रंगली होती.
advertisement
7/7
मुनमुन दत्ताने वयाच्या 17 व्या वर्षी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'हम सब बाराथी' ही तिची पहिली मालिका होती. पण 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने खऱ्या अर्थाने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तारक मेहता'ची बबीता कोट्यवधींची मालकीण, एका एपिसोडसाठी किती घेते पैसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल