TRENDING:

Tejashri Pradhan : 25 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार तेजश्री प्रधान, आहे मराठी सुपरस्टारचा मुलगा

Last Updated:
Tejashri Pradhan New Movie : तेजश्री प्रधानच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. हा सिनेमा यूकेमध्ये शूट झाला असून तेजश्री प्रधान तिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
advertisement
1/6
25 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार तेजश्री प्रधान
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्रीने काही दिवसांआधी तिच्या नव्या वेब सीरिजच्या सेटवरचे फोटो शेअर केले होते. दरम्यान तेजश्रीच्या अपकमिंग सिनेमाची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 
advertisement
2/6
मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज सुपरस्टारच्या मुलासोबत तेजश्री प्रधान स्क्रिन शेअर करणार आहे. मराठीतील हँडसम हंक अभिनेता तेजश्री प्रधानपेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे. दोघे पहिल्यांदाच एकत्र सिनेमात दिसणार आहे. 
advertisement
3/6
तेजश्री प्रधानच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर आणि रिलीज डेटही समोर आली आहे. 'असा मी तशी मी' असं या सिनेमाचं नाव आहे. हा संपूर्ण सिनेमा यूकेमध्ये शूट करण्यात आला आहे.  
advertisement
4/6
नव्या पिढीच्या रोमँसची झलक देणारं सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. पोस्टरमध्ये तेजश्रीबरोबर दिसणारा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेते रमेश देव यांचा मुलगा अभिनेते अजिंक्य देव.  पोस्टरवर  तेजश्री प्रधान आणि अजिंक्य रमेश देव यांचा डॅशिंग लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
advertisement
5/6
अभिनेते अजिंक्य देव यांचा '120 बहादूर' हा सिनेमा येत्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. अभिनेते अजिंक्य देव 62 वर्षांचे असून आजही फिट आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो ते शेअर करत असतात.
advertisement
6/6
तेजश्री प्रधान आणि अजिंक्य देव यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली. 90 चा देखणा अभिनेता आणि आताची सगळ्यात आघाडीची अभिनेत्री अशी ही जोडी मोठ्या पडद्यावर काय जादू करणार हे पाहण्यासारखं आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : 25 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार तेजश्री प्रधान, आहे मराठी सुपरस्टारचा मुलगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल