ना सप्तपदी, ना निकाह! हटके पद्धतीने झालं होतं हृतिक रोशन-सुझान खानचं लग्न; घटस्फोटानंतरही लव्हस्टोरी हिट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hrithik Roshan-Suzanne Khan Wedding Story : हृतिक आणि सुझानच्या १४ वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाची अनोखी गोष्ट समोर आली आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे.
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुझान खान हे आजही त्यांचा घटस्फोट आणि त्यानंतरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे चर्चेत असतात. नुकतेच हृतिकच्या एक्स सासूबाई, झरीन खान यांचे निधन झाले.
advertisement
2/7
झरीन खान पारसी असूनही त्यांनी मुस्लिम अभिनेते संजय खान यांच्याशी लग्न केले होते. मात्र, त्यांच्यावर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थनाभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
advertisement
3/7
याच पार्श्वभूमीवर, हृतिक आणि सुझानच्या १४ वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाची अनोखी गोष्ट समोर आली आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे. २००० साली हृतिक रोशन आणि सुझान खान विवाहबंधनात अडकले. त्यांनी कोणताही धार्मिक विधी न करता लग्न केले होते.
advertisement
4/7
रेडिफला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत हृतिकने या लग्नाबद्दल माहिती दिली होती. तो म्हणाला होता, "आम्ही आमच्या मर्जीने लग्न केले. ना हिंदू रीतिरिवाज आणि ना निकाह. आम्ही दोघांनी नेहमीच एका शांत आणि चर्चमध्ये होणाऱ्या लग्न समारंभाप्रमाणे विवाह करण्याचे ठरवले होते."
advertisement
5/7
हृतिकला चर्चमध्ये होणारी लग्ने खूप छोटी आणि सुंदर वाटायची. त्यामुळे त्यांनी हिंदू-मुस्लिम पद्धतीने लग्न न करता वेगळा मार्ग निवडला. त्यांनी बंगळूरमध्ये अगदी तशाच प्रकारचा समारंभ आयोजित केला.
advertisement
6/7
"आशियातील सर्वात मोठा स्विमिंग पूल आणि त्याच्या किनारी फुले होती. आम्ही चालत पूलच्या मध्यभागी गेलो. तिथे आम्ही शपथ घेतली आणि कागदपत्रांवर सह्या केल्या," असे हृतिकने सांगितले.
advertisement
7/7
या दोघांनी धर्म आणि परंपरा बाजूला ठेवून केवळ प्रेमासाठी लग्न केले, पण दुर्दैवाने लग्नाच्या १४ वर्षांनंतर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आजही हृतिक आणि सुझान एकमेकांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखात सोबत उभे राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना सप्तपदी, ना निकाह! हटके पद्धतीने झालं होतं हृतिक रोशन-सुझान खानचं लग्न; घटस्फोटानंतरही लव्हस्टोरी हिट