TRENDING:

Bollywood Superhit Movie : वडिलांच्या जबरदस्तीमुळे बनला हिरो, अनिल कपूरही ज्याला घाबरायचा, कोण आहे तो?

Last Updated:
Bollywood Superhit Movie : ९० च्या दशकात ॲक्शन आणि रोमँटिक चित्रपटांचा ट्रेंड खूप वाढला. अशात;, १९९१ मध्ये एका अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री केली.
advertisement
1/9
वडिलांच्या जबरदस्तीमुळे बनला हिरो, अनिल कपूरही ज्याला घाबरायचा, कोण आहे तो?
मुंबई: ९० च्या दशकात ॲक्शन आणि रोमँटिक चित्रपटांचा ट्रेंड खूप वाढला. अशाच वातावरणात, १९९१ मध्ये ॲक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगण याने 'फूल और कांटे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री केली. या चित्रपटात हेमा मालिनी यांची भाची मधू हिनेही पदार्पण केले होते.
advertisement
2/9
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यश चोप्रा यांच्या 'लम्हे' या अनिल कपूर-श्रीदेवी यांच्या मोठ्या चित्रपटासोबत 'फूल और कांटे'ची टक्कर झाली, पण अजयच्या चित्रपटाने बाजी मारत सुपरहिटचा शिक्का बसला. पण तुम्हाला माहीत आहे का, अजय देवगणला हा चित्रपट करायचाच नव्हता, वडिलांच्या सक्तीमुळे त्याला हिरो बनावे लागले.
advertisement
3/9
अजय देवगण 'फूल और कांटे'साठी सुरुवातीला अजिबात उत्सुक नव्हता. एका मुलाखतीत अजयने सांगितले, "मी कॉलेजमध्ये होतो, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होतो आणि माझे आयुष्य एन्जॉय करत होतो. एक दिवस घरी आलो, तेव्हा वडिलांनी सांगितले की, तुला हा चित्रपट करावाच लागेल, कुक्कू कोहली दिग्दर्शन करतील. मला अक्षरशः सक्तीने हा चित्रपट करावा लागला." यानंतर अवघ्या एका महिन्यात त्याने शूटिंग सुरू केले.
advertisement
4/9
वीरू देवगण यांनी सांगितले होते, "एसीमध्ये झोपणाऱ्या मुलाला सकाळी ६ वाजता उठवून हिरो बनवणे सोपे नव्हते. मी त्याला एक वर्ष उर्दू, ॲक्शन, डान्स आणि जिमचे प्रशिक्षण दिले."
advertisement
5/9
दरम्यान, 'फूल और कांटे' रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची हिरोईन मधू चार दिवस घरात लपून बसली होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मधूने फर्स्ट कट पाहिला, तेव्हा तिला तो अजिबात आवडला नाही. तिला वाटले की हा चित्रपट फ्लॉप होईल आणि लोक माझी खिल्ली उडवतील.
advertisement
6/9
मधूने नंतर एका मुलाखतीत सांगितले, "मला वाटलं हा चित्रपट चांगला बनला नाही, तो चालणार नाही. लोक माझ्यावर टीका करतील या भीतीने मी तीन-चार दिवस घराबाहेर पडले नाही."
advertisement
7/9
'फूल और कांटे' हा मल्याळम चित्रपट 'परम्परा'चा' रिमेक होता. ३ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १२ कोटींचा व्यवसाय केला आणि हा चित्रपट १९९१ मधील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
advertisement
8/9
'तुमसे मिलने को दिल करता है' या गाण्यामुळे नदीम-श्रवण यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला, तर अजय देवगणला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला.
advertisement
9/9
अनिल कपूरने वीरू देवगण यांना चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची विनंती केली होती, पण अजयने नकार दिला आणि बॉक्स ऑफिसवर अजयचा चित्रपट 'लम्हे'पेक्षा वरचढ ठरला. चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी जेव्हा 'जिसे देख मेरा दिल धडका' हे गाणे लागले, तेव्हा चाहत्यांनी पडद्यावर नाणी फेकली होती. अजयने ती नाणी उचलून फ्रेम करून ठेवली आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Superhit Movie : वडिलांच्या जबरदस्तीमुळे बनला हिरो, अनिल कपूरही ज्याला घाबरायचा, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल