विशेषतः तरुणांमधे या समस्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही अनेकदा यामागची कारणं असतात. म्हणूनच, हिवाळ्यात किडनी स्टोनचे रुग्ण का वाढतात आणि कोणती लक्षणं त्यांना ओळखण्यासाठी महत्त्वाची आहेत, समजून घेऊयात.
Skin Care :इन्स्टंट कॉफीसारखाच इन्स्टंट ग्लो, चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी कॉफी पावडर
हिवाळ्यात तापमान कमी होतं, त्यामुळे घाम येणं थांबतं किंवा तुलनेनं कमी होतं. यामुळे आपल्याला तहान कमी लागते, ज्यामुळे आपण कमी पाणी पितो. पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही तर आपल्या मूत्रपिंडांनाही त्याची अत्यंत गरज असते.
advertisement
मूत्रपिंड शरीरातील काही खनिजं फिल्टर करतात, ज्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी पुरेसं न प्यायल्यानं कॅल्शियम आणि युरिक ऍसिडचं स्फटिकीकरण करू शकते. यामुळे मूत्रपिंडात दगडासारख्या रचना तयार होतात, ज्याला मूतखडा किंवा किडनी स्टोन म्हणतात.
मूतखड्याची लक्षणं कोणती ?
किडनी स्टोन तयार होतात तेव्हा शरीरात काही लक्षणं दिसून येतात. किडनी स्टोनचं निदान लवकर झालं तर उपचार मिळण्यास मदत होते. किडनी स्टोनची काही सामान्य आणि सुरुवातीची लक्षणं लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
मळमळ, लघवीत रक्त येणं, लघवी करताना जळजळ होणं, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणं, मागे किंवा खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना होणं.
Bloating: पोटफुगी का होते ? कारणं शोधा, उपचार करा, पोटाचा जडपणा होईल दूर
किडनी स्टोनच्या वेदना खूप असतात. म्हणून, त्या टाळण्यासाठी काळजी घेणं आणि निष्काळजीपणा टाळणं आवश्यक आहे. या टिप्स नक्की लक्षात ठेवा -
- दररोज किमान तीन लीटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला हायड्रेटेड राहण्यासाठी आणि मूत्रपिंडांचं कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
- मीठ खाणं मर्यादित करणं गरजेचं आहे.
- प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळा.
- आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करा.
- आहारात लिंबूवर्गीय फळं आणि फायबरचा समावेश करा. यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो.
- साखर आणि कार्बोनेटेड पेयं टाळा, कारण यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
- चयापचयाचा वेग आणि किडनीचं आरोग्य सुधारण्यासाठी दररोज व्यायाम करा.
