Bloating : पोटफुगी टाळण्यासाठी हे उपाय करा, पोटफुगीचा त्रास होईल कमी, पोटाला मिळेल आराम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पोटफुगी टाळण्यासाठी, त्याची कारणं समजून घेणं महत्वाचं आहे. हे त्रास पुन्हा उद्भवले तर त्याचे ट्रिगर्स ओळखणं महत्वाचं आहे. यामुळे तुम्ही पोटफुगीचा त्रास टाळू शकता.
मुंबई : गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट (GI) च्या काही भागात गॅस जमा झाल्यामुळे पोट फुगण्याचा त्रास जाणवतो. यामुळे पोट नेहमीपेक्षा जास्त फुगलेलं दिसतं आणि पोटात वेदना होतात. कधीकधी, द्रवपदार्थ साठल्यानं देखील पोट फुगू शकतं.
पोटफुगी टाळण्यासाठी, त्याची कारणं समजून घेणं महत्वाचं आहे. हे त्रास पुन्हा उद्भवले तर त्याचे ट्रिगर्स ओळखणं महत्वाचं आहे. यामुळे तुम्ही पोटफुगीचा त्रास टाळू शकता.
या कारणांमुळे पोटफुगी होऊ शकते -
पोटाच्या समस्या: बद्धकोष्ठता, अन्नाची अॅलर्जी आणि दुधासारखे पदार्थ सहन न होणं, यामुळे पोटफुगी होऊ शकते.
advertisement
अन्न: आंबट पेयं, मीठ किंवा साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ आणि आहारात फायबरची कमतरता यामुळे पोटफुगी होऊ शकते.
हार्मोनल बदल: अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी आणि दरम्यान पोटफुगीचा त्रास होतो.
जलद आराम मिळवण्यासाठी, चालत जा.
हालचाल केल्यानं आतड्यांच्या हालचाली देखील सुधारतात, ज्यामुळे अतिरिक्त वायू किंवा मल बाहेर पडण्यास मदत होते. पोट फुगल्यासारखं वाटत असेल, तर थोडंसं फिरल्यानं आराम मिळू शकतो.
advertisement
योगा करा - काही योगासनांमुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि वायू बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पोटफुगी कमी होण्यास मदत होऊ शकते. बालासन, आनंद बालासन किंवा स्क्वॅटिंग पोझेस सारख्या आसनांमुळे आराम मिळू शकतो.
पोटाची मालिश - पोटाची मालिश केल्यानं आतड्यांच्या हालचाली सुलभ होऊ शकतात. हात कंबरेच्या हाडांच्या अगदी वर ठेवा. आता उजव्या बाजूला वर्तुळाकार हालचालीत हलका दाब द्या. हळूहळू कंबरेच्या डाव्या बाजूला जा आणि थोडा दाब द्या, बरं वाटलं तर ही प्रक्रिया पुन्हा करा.
advertisement
कोमट पाण्यानं आंघोळ करा - कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं पोट फुगण्यापासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो. यामुळे पोटातील ताण कमी होतो आणि शरीराचं कार्य पूर्ववत होतं.
गॅस कमी करणारी औषधे - कधीकधी गोळ्या किंवा द्रवपदार्थ गॅस कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. यामुळे पचनसंस्थेतील अतिरिक्त गॅस बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटातला जडपणा कमी होतो. हे वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.
advertisement
आतड्यांचा आजार - इरिटेबल बोवेल सिंड्रोम, एंडोमेट्रिओसिस आणि ओवेरियन सिस्टसारख्या आजारांमुळेही हा त्रास होतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 6:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bloating : पोटफुगी टाळण्यासाठी हे उपाय करा, पोटफुगीचा त्रास होईल कमी, पोटाला मिळेल आराम


