Constipation : हिवाळ्यातल्या पोटाच्या समस्येला करा बाय बाय, ही फळं करतील मदत, वाचा विंटर डाएट टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थंडीच्या दिवसांत आपली पचनसंस्था मंदावते आणि आपण कमी पाणी पितो, ज्यामुळे मल कठीण होतो. डॉ. शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी हिवाळ्यात उपयुक्त ठरु शकतील अशा पाच फळांची यादी केली आहे. या फळांमुळे नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
मुंबई : हिवाळा सुरु झालाय. या वातावरणात, आल्हाददायक वाटतंच पण काहींना हा ऋतू त्रासदायक ठरु शकतो. अनेकांना या ऋतूत बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.
थंडीच्या दिवसांत आपली पचनसंस्था मंदावते आणि आपण कमी पाणी पितो, ज्यामुळे मल कठीण होतो. डॉ. शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी हिवाळ्यात उपयुक्त ठरु शकतील अशा पाच फळांची यादी केली आहे. या फळांमुळे नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
advertisement
संत्री - संत्र्यांमधील व्हिटॅमिन सी, फायबर नैसर्गिकरित्या मोठं आतडं स्वच्छ करतात. संत्र्यांत असलेले पेक्टिन मल मऊ करतं, ज्यामुळे पोट रिकामं करणं सोपं होतं. यासाठी डॉक्टर संत्र्याच्या रसाऐवजी अख्खं संत्र खाण्याचा सल्ला देतात.
नाशपती - नाशपतीत आढळणारे सॉर्बिटॉल नैसर्गिक सौम्य रेचक म्हणून काम करते. यामुळे आतड्यांमधील ओलावा वाढतो आणि मल मऊ होतो. नाशपती दुपारी खावं आणि सालासह खाण्याची शिफारस करतात.
advertisement
सफरचंद - सफरचंदातही चांगल्या प्रमाणात फायबर असतं. शिवाय, त्यातील पेक्टिन घटक मलामधे मोठ्या प्रमाणात वाढ करतात, ज्यामुळे ते बाहेर पडणं सोपं होतं. भिजवलेल्या चिया बियांसह सफरचंद खाल्ल्यानं त्याचा परिणाम दुप्पट होतो. चिया सीड्स पाणी शोषून घेतात आणि एक जेल तयार करतात, यामुळे आतड्यांना वंगण मिळतं आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
advertisement
अंजीर - अंजीरांमधे भरपूर फायबर असतं आणि ते प्रीबायोटिक देखील असतात, म्हणजेच ते आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. दररोज सकाळी दोन भिजवलेले अंजीर खाल्ल्यानं पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता लक्षणीयरीत्या कमी होते.
पपई - पपईतील पपेन एंझाइम पचनक्रिया जलद करते. हे एंझाइम अन्नाचं विघटन करण्यास मदत करते, ज्यामुळे गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यापासून आराम मिळतो.
advertisement
हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर औषधं घेण्याऐवजी दैनंदिन आहारात या नैसर्गिक फळांचा समावेश करा. तसंच, भरपूर पाणी प्या, हलका व्यायाम करा आणि फायबरयुक्त पदार्थ खा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 8:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Constipation : हिवाळ्यातल्या पोटाच्या समस्येला करा बाय बाय, ही फळं करतील मदत, वाचा विंटर डाएट टिप्स