Skin Care : केळ्याच्या सालांच्या वापरानं चेहरा होईल मुलायम, शहनाज हुसेन यांच्या स्किन केअर टिप्स ठरतील उपयोगी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहऱ्यासाठी केळ्याच्या सालाचा वापर कसा करायचा याबद्दल प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी काही टिप्स दिल्यात. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसत असेल, तर ताज्या केळीच्या सालीचा आतील भाग दोन-तीन मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हातानं घासून घ्या आणि नंतर दहा-पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर, चेहरा थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते.
मुंबई : केळं खाल्ल्यानंतर साल आपण फेकून देतो, पण हे साल त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं. केळीच्या सालात व्हिटॅमिन सी असतं. यात व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे त्वचा चमकदार, मऊ राहते.
चेहऱ्यासाठी केळ्याच्या सालाचा वापर कसा करायचा याबद्दल प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी काही टिप्स दिल्यात. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसत असेल, तर ताज्या केळीच्या सालीचा आतील भाग दोन-तीन मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हातानं घासून घ्या आणि नंतर दहा-पंधरा मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर, चेहरा थंड पाण्यानं धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते.
advertisement
केळीची साल आणि मधाचा फेस मास्क - एका लहान केळीचं साल कुस्करुन घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटं तसंच राहू द्या. मधाचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म आणि केळीच्या सालींमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला खोलवर पोषण देतात. कोरड्या त्वचेसाठी हा मास्क विशेषतः फायदेशीर आहे.
advertisement
केळीच्या सालातील ल्युटीन आणि झिंक सूज कमी करण्यास मदत करतात. केळीच्या सालीचा तुकडा मुरुमांनी प्रभावित झालेल्या भागावर दररोज काही मिनिटं हलक्या हातानं घासा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल आणि डाग हळूहळू कमी होतील.
त्वचेवर मृत पेशी म्हणजेच डेड स्किन जमा झाली असेल तर केळीची साल बारीक करा आणि त्यात थोडं दही किंवा गुलाबपाणी मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. या स्क्रबमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि ती मऊ आणि चमकदार बनवते.
advertisement
केळीच्या सालांचा वापर करणं ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : केळ्याच्या सालांच्या वापरानं चेहरा होईल मुलायम, शहनाज हुसेन यांच्या स्किन केअर टिप्स ठरतील उपयोगी