Skin Care : कॉफी पावडरचा असा उपयोग नक्की करुन पाहा, चेहरा दिसेल स्वच्छ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कॉफी पावडरचं सर्वात लहान पॅकेट फक्त दोन रुपयांना सहज उपलब्ध आहे. यानं इन्स्टंट कॉफी तर तयार होतेच पण त्वचेच्या विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो. जाणून घेऊयात कसा करायचा वापर.
मुंबई : हिवाळा सुरु झालाय, वातावरण बदलतंय. बदलत्या हवामानात त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. हिवाळ्यात, कोरड्या हवेमुळे त्वचेतला ओलावा काढला जातो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.
यासाठी काही घरगुती उपचार खूप प्रभावी ठरतात. म्हणूनच, आज आपण कॉफीशी संबंधित काही घरगुती उपाय पाहणार आहोत जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.
कॉफी पावडरचं सर्वात लहान पॅकेट फक्त दोन रुपयांना सहज उपलब्ध आहे. यानं इन्स्टंट कॉफी तर तयार होतेच पण त्वचेच्या विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो. डिजिटल क्रिएटर ध्रुव मल्होत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओमधे ही माहिती शेअर केली आहे.
advertisement
कॉफी आणि बेसन - चेहऱ्यावरील टॅनिंगची काळजी वाटत असेल, तर हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. कॉफीत पाणी आणि बेसन मिसळा आणि ते लावा. यामुळे केवळ डाग दूर होतीलच, शिवाय रंगही उजळेल.
दुधासोबत कॉफी - हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी दुधात कॉफी मिसळून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा हायड्रेट होईल आणि ओलावा टिकून राहील.
advertisement
कॉफी आणि गुलाबजल - त्वचा चमकदार आणि मऊ करण्यासाठी, कॉफीत गुलाबजल मिसळून ते लावू शकता.
कॉफी आणि कोरफड जेल - चेहऱ्यावर लालसरपणा आणि मुरुमं असतील तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. कॉफीत कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे मृत पेशी निघून जातील आणि त्वचेतील अशुद्धता दूर होईल.
advertisement
कॉफी आणि मध - कॉफीत मध मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळेही चेहऱ्यावर चांगला ग्लो येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 7:54 PM IST


