Nana Patekar: मित्राच्या संकटात धावून गेले नाना पाटेकर, स्वतःचं घरही गहाण ठेवलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nana Patekar: बॉलिवूडमध्ये रफ अँड टफ स्वभावासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर. दमदार अभिनयासोबत रागीट अशीही नानांची ओळख आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की हे रागीट वाटणारे नाना जिवलग नात्यांसाठी खूप हळवे आहेत.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये रफ अँड टफ स्वभावासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर. दमदार अभिनयासोबत रागीट अशीही नानांची ओळख आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की हे रागीट वाटणारे नाना जिवलग नात्यांसाठी खूप हळवे आहेत.
advertisement
2/7
सडेतोड बोलणं आणि तगडं व्यक्तिमत्त्व हे त्यांचं एक अंग असलं तरी, नाना पाटेकर एक संवेदनशील, दिलदार आणि मैत्रीत जीव ओतणारे व्यक्तिमत्त्व देखील आहेत. असाच एक किस्सा जेव्हा नाना पाटेकर यांनी त्यांच्या मित्रासाठी चक्क घर गहाण ठेवलं होतं.
advertisement
3/7
‘अंकुश’ चित्रपटाने ओळख मिळवलेल्या नानांना या सिनेमाचे दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्यासोबत विशेष स्नेह होता. चंद्रा एका काळात आर्थिक अडचणीत होते. त्यावेळी कुठूनही मदत मिळत नव्हती. शेवटी त्यांनी आपले जवळचे मित्र नाना पाटेकरकडे हात पुढे केला.
advertisement
4/7
नानांकडे त्या वेळी स्वतःजवळही फारसे पैसे नव्हते. पण ‘मित्र संकटात आहे, त्याला वाचवलंच पाहिजे’ या विचाराने त्यांनी कोणतीही तमा न बाळगता आपलं स्वतःचं घर गहाण ठेवून त्यांना मदत केली.
advertisement
5/7
चंद्रा यांनी त्यानंतर पैसे परत करताच नानांचे घरही पुन्हा त्यांच्या नावावर आलं. या घटनेचं खासपणं इथंच संपत नाही चंद्रांनी कृतज्ञता व्यक्त करत नानांना एक स्कूटर भेट दिली. तो क्षण नानांसाठी ‘कोट्यवधींच्या भावना’ देणारा होता.
advertisement
6/7
आज नाना पाटेकर केवळ अभिनेता नाहीत, तर समाजसेवक, शेतकऱ्यांचा आधार आणि खराखुरा माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘नाम फाउंडेशन’मार्फत त्यांनी हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलून टाकले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, नाना पाटेकर यांनी नुकताच आलेला ‘हाऊसफुल 5’मधून धमाकेदार कमबॅक केलं. त्यांच्या अभिनयाने त्यांनी पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nana Patekar: मित्राच्या संकटात धावून गेले नाना पाटेकर, स्वतःचं घरही गहाण ठेवलं, नेमकं काय घडलं?