TRENDING:

Netflix Trending Movies : OTT वर काय पाहायचं विचार करताय? ही घ्या नेटफ्लिक्सवरील ट्रेडिंग फिल्मची लिस्ट

Last Updated:
Netflix Top 10 Trending Films : नेटफ्लिक्सवरील 'टॉप 10' ट्रेडिंग चित्रपटांची लिस्ट आता समोर आली आहे. क्राईम, थ्रील, हॉरर ते कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहेत.
advertisement
1/10
OTT वर काय पाहायचं विचार करताय? ही घ्या Netflix वरील ट्रेडिंग फिल्मची लिस्ट
द गर्लफ्रेंड (The Girlfriend) : रश्मिका मंदाना अभिनीत 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध आहे.
advertisement
2/10
आर्यन (Aaryan) : नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर विष्णु विशालचा 'आर्यन' हा चित्रपट ट्रेंड करतोय. सीरियल किलरच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. सस्पेन्सची आवड असणाऱ्यांसाठी ही फिल्म परफेक्ट आहे. एकदा हा सिनेमा पाहायला घेतला की पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही जागेवरुन उठूच शकत नाही.
advertisement
3/10
स्टीफन (Stephen) : 'स्टीफन' ही फिल्म 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाली असून तिसऱ्या क्रमांकावर सध्या ट्रेंड करतेय. एका सायको किलरच्या अवतीभोवती फिरणारं या चित्रपटाचं कथानक आहे. प्रेक्षकांना हिंदीत हा चित्रपट पाहता येईल.
advertisement
4/10
सनी संस्कारी की तुलसी कुमारी (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) : वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा चित्रपट आहे. या रोमँटिक फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा शशांक खेताने सांभाळली आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
5/10
ट्रोल 2 (Troll 2) : 'ट्रोल 2' नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ही सायन्स फिक्शन हिंदी फिल्म नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल.
advertisement
6/10
जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारची 'जॉली एलएलबी 3' ही कोर्टरूम ड्रामा फिल्म नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. सौरभ शुक्ला, अरशद वारसी, गजराज राव आणि राम कपूर हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/10
बँड बाजा बारात (Band Baaja Baaraat) : रणवीर सिंहचा 'बँड बाजा बारात' हा चित्रपट 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. त्यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता नेटफ्लिक्सवर हा सिनेमा सातव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
advertisement
8/10
जथारा (Jathara) : रवी तेजा अभिनीत 'जथारा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आठव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ही अॅक्शन एंटरटेनर फिल्म आहे.
advertisement
9/10
होमबाउंड (Homebound) : ईशान खट्टरची बहुचर्चित 'होमबाउंड' ही फिल्म नेटफ्लिक्सच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात विशाल जेठवा, जान्हवी कपूर, हर्षिता परमार हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
10/10
डूड (Dude) : 'डूड' ही फिल्म नेटफ्लिक्सवर दहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. बालपणीच्या दोन मित्रांची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्रदीप रंगनाथन आणि ममिता बैजू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix Trending Movies : OTT वर काय पाहायचं विचार करताय? ही घ्या नेटफ्लिक्सवरील ट्रेडिंग फिल्मची लिस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल