नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तिघेही रिक्षा चालक आहेत. यातील दोन आरोपींची पीडित तरुणीशी आधीपासून ओळख होती. घटनेच्या दिवशी, ओळखीचे दोन रिक्षा चालक पीडितेला पार्टीसाठी बाहेर घेऊन गेले होते. विश्वासामुळे पीडित तरुणी त्यांच्यासोबत गेली होती.
advertisement
पार्टीच्या बहाण्याने हे दोन्ही आरोपी तरुणीला तिसऱ्या साथीदाराच्या घरी घेऊन गेले. तिथे गेल्यावर मद्यपान करण्यात आले. तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर या तिन्ही रिक्षा चालकांनी मिळून पीडित तरुणीवर अमानुषपणे आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.
पोलिसांची तत्पर कारवाई
घडलेल्या प्रकारानंतर पीडित तरुणीने हिंमत दाखवत थेट टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास टिळकनगर पोलीस करत आहेत. ओळखीचा फायदा घेऊन पार्टीच्या बहाण्याने एका तरुणीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या रिक्षा चालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
