TRENDING:

लंडनमधून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट! 50 हजारांचं 1 सीरम, चेहऱ्याला लावायच्या Moisturizer ची किंमत ऐकून गार व्हाल

Last Updated:
Nikki Tamboli Make Up Product Shocking Price : निक्की तांबोळीच्या ग्लॅमरस लुकमागे लाखो रुपये लागले आहेत. लंडनहून येतात तिचे मेकअप प्रोडक्ट. किंमत ऐकून तुम्ही गार व्हाल.
advertisement
1/10
लंडनमधून येतात निक्कीचे मेकअप प्रोडक्ट! 50 हजारांचं 1 सीरम,  Moisturizer तर...
मॉडेल आणि रिअलिटी शोची स्टार निक्की तांबोळी नेहमीच तिच्या ग्लमरमुळे चर्चेत राहिली आहे. मराठमोळ्या निक्की तांबोळीनं हिंदी इंडस्ट्रीत जाऊन स्वत: चं वेगळं नाव कमावलं. निक्की तांबोळी हे नाव समोर आलं की निक्कीची लग्झरी लाईफस्टाइल, तिचे ग्लॅमरस लुक, बोल्ड लुक.
advertisement
2/10
हिंदी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर निक्की तांबोळीनं तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली. नाक आणि ओठांची सर्जरी केल्यानंतर निक्की तांबोळी वेगळीच दिसू लागली. तिला त्यामुळे ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
advertisement
3/10
पण सर्जरीनंतरही निक्कीला चाहत्यांनी स्वीकारलं. निक्की स्वत:च्या लाईफ स्टाईलवर खूप पैसे खर्च करते. तिच्या ग्लमरस दिसण्यामागे लाखो रुपये तिनं लावले आहेत. तिच्या मेकअप प्रोडक्टची किंमत ऐकून तुम्ही घाम फुटेल.
advertisement
4/10
निक्की सध्या The 50 शोमध्ये आहे. याच शोमध्ये निक्कीच्या महागड्या मेकअप प्रोडक्टबद्दलची माहिती समोर आली आहे. निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाजनेच हे नॅशनल टीव्हीवर सांगितलं.
advertisement
5/10
The 50 शोमध्ये निक्कीला लायनकडून एक टास्क देण्यात आला होता. ज्यात तिला घरातील सदस्यांचं सामान चोरी करायचं होतं आणि त्याबदल्यात मनी पॉटमध्ये पैसे जमा होणार होते.
advertisement
6/10
सुरुवातीला निक्कीने इतर स्पर्धकांचं सामान चोरलं. त्यानंतर सगळ्यांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर तिने इतर स्पर्धकांचं सामान चोरण्यापेक्षा तिचे सगळे मेकअप प्रोडक्ट लायनला दिले आणि मनी पॉटमध्ये 1 लाख रुपये जमा केले. त्यानंतर निक्की ढसाढसा रडू लागली.
advertisement
7/10
निक्की लायनच्या रूममध्ये असताना बाहेर सगळे निक्कीच्या विरोधात गेले. तेव्हा अरबाजने सांगितलं की, ती स्वत:चं सगळं सामान देईल पण तुमच्या सामानांना हात लावणार नाही.
advertisement
8/10
अरबाजने सांगितलं, "आमच्या मराठी बिग बॉसमध्ये एक मुलगा जिंकला. त्यानंतर त्याची एक फिल्म आली. त्याच्या प्रीमियरला ती जाऊ शकली नाही. त्यामुळे तिने दुसऱ्या दिवशी संपूर्ण थिएटर बुक केलं आणि तिकिटं त्याच्या फॅन्सना वाटली."
advertisement
9/10
तिचं सीरमच 50 हजारांचं आहे. निक्कीचे सगळे मेकअप प्रोडक्ट लंडनहून येतात. तिच्या 75 हजारांचं एक मोस्चराइझर आहे, असंही अरबाजने सांगितलं.
advertisement
10/10
75 हजारांच्या एक मोस्चराइझरमध्ये तुमच्या काही वर्षांची शॉपिंग आरामात होईल. निक्की स्वत:च्या पैशांनी तिचे सगळे मेकअप प्रोडक्ट खरेदी करते. इंडस्ट्रीत अनेक वर्ष काम करत असताना निक्की मजबूत कमाई करते हे यावरून कळतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लंडनमधून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट! 50 हजारांचं 1 सीरम, चेहऱ्याला लावायच्या Moisturizer ची किंमत ऐकून गार व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल