मोठ्या पडद्यावर येण्यासाठी बनला 'गे', तरी लाखो तरुणींच्या मनावर करतोय राज्य, एका झलकेसाठी चाहते उतावळे
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे भारतातच नाही तर जरभरात असंख्य चाहते आहेत. शाहरुखचा 'दीवाना' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मात्र त्याने 'दीवाना' च्या आधी 'राजू बन गया जेंटलमैन' हा चित्रपट साइन केला होता जो 'दीवाना'नंतर रिलीज झाला.
advertisement
1/7

2/7
तथापि, मोठ्या पडद्यावर येण्याआधी शाहरुखने काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की शाहरुख खानने त्याच्या अभिनयाची सुरूवात कोणत्याही चित्रपटातून नाही तर एका इंग्लिश टेली फिल्ममधून केली होती.
advertisement
3/7
1989 साली जेव्हा शाहरुख सर्कस आणि फौजीसारखे शो करत होता तेव्हा त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने एका समलिंगी विद्यार्थ्याचे पात्र साकारले होते.
advertisement
4/7
हा चित्रपट कधीही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला नाही. दूरदर्शन आलेल्या शाहरुख खानच्या या डेब्यू इंग्रजी चित्रपटाचे नाव 'इन व्हिच एनी गिव्स इट दोज़ वन्स' असे आहे.
advertisement
5/7
या चित्रपटाची पटकथा अरुंधती रॉय यांनी लिहीली होती, तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप कृष्णा यांनी केले होते. या चित्रपटाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला. असे सांगितले जाते की हा चित्रपट आनंद ग्रोवर यांच्यावर आधारित आहे.
advertisement
6/7
चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये अर्जुन रैना दिसले होते. तसेच चित्रपटात रोशन सेठ यांच्यासह अरुंधती रॉयही मुख्य भुमिका साकारताना दिसल्या. इतकंच नाही तर चित्रपटातील काही दृष्यांमध्ये मनोज बायपेयी यांनीही काम केले आहे.
advertisement
7/7
त्या दिवसांमध्ये शाहरुख खान आणि मनोज बाजपेयी दोघेही या क्षेत्रात येण्यासाठी संघर्ष करत होते. दरम्यान शाहरुखने यानंतर कधीही असे पात्र साकारले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मोठ्या पडद्यावर येण्यासाठी बनला 'गे', तरी लाखो तरुणींच्या मनावर करतोय राज्य, एका झलकेसाठी चाहते उतावळे