OTT Best Psycho-Thriller: 123 मिनिटांत डोकं होईल सुन्न! 9 हत्यांमागचं भयाण गुपित; OTT वर 'या' सायकॉलॉजिकल थ्रिलरचा धुमाकूळ!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Psycho-Thriller: जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीच्या कथा आवडत असतील, तर हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवा.
advertisement
1/8

मुंबई: २०२५ हे वर्ष आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. थंडीचे दिवस आणि वर्षाचा शेवट... अशा वातावरणात घरामध्ये पांघरूण ओढून एखादा जबरदस्त थ्रिलर सिनेमा बघण्याची मजा काही वेगळीच असते.
advertisement
2/8
ओटीटी प्रेमींसाठी हीच मजा डबल करण्यासाठी नेटफ्लिक्सने एक सिनेमा आणला आहे. सध्या सोशल मीडियावर आणि नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये एकाच सिनेमाचं नाव गाजतंय, ते म्हणजे 'स्टीफन'. अवघ्या १२३ मिनिटांचा हा सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर तुमच्या मेंदूच्या नसा ताणून धरेल, इतका हा सिनेमा डार्क आहे.
advertisement
3/8
मिथुन बालाजी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटात गोमती शंकर, स्मृती व्यंकट आणि मायकल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा केवळ एक साधा मर्डर मिस्ट्री सिनेमा नाही, तर एका मानवी मनाच्या गडद कोपऱ्यांचा प्रवास आहे.
advertisement
4/8
सिनेमाची कथा फिरते ती 'स्टीफन जेबराज' (गोमती शंकर) या एका सायको किलरच्या अवतीभोवती. हा स्टीफन इतका क्रूर आहे की, अवघ्या ६ महिन्यांत त्याने ९ महिलांना अत्यंत निर्दयीपणे मृत्यूच्या दारात ढकललं आहे. पण प्रश्न असा उरतो की, एकापाठोपाठ एक हत्या करण्यामागे त्याची नक्की काय सणक आहे?
advertisement
5/8
या खुन्याच्या डोक्यात काय चाललंय आणि त्याच्या भूतकाळातील कोणती जखम त्याला हे करायला भाग पाडतेय, हे शोधण्याचं आव्हान स्वीकारते सायकियाट्रिस्ट सीमा (स्मृती व्यंकट). सीमा आणि स्टीफन यांच्यातील संवादाचे प्रसंग म्हणजे शब्दांचं एक धारदार युद्धच आहे.
advertisement
6/8
सीमा जसा जसा तपास पुढे नेते, तसे स्टीफनच्या आयुष्यातील असे काही भीषण सत्य समोर येतात, जे पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
advertisement
7/8
'स्टीफन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या काळजाला भिडतोय कारण तो एका सत्य घटनेवर आधारित आहे. २०२१ मध्ये केरळमधील 'सेंट थॉमस कॉलेज, पाला' येथे एका २२ वर्षांच्या तरुणीची तिच्याच वर्गमित्राने भरदिवसा गळा चिरून हत्या केली होती. या थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेला काल्पनिकतेची जोड देऊन दिग्दर्शकाने मानवी क्रूरतेचा एक वेगळा पैलू पडद्यावर मांडला आहे.
advertisement
8/8
जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीच्या कथा आवडत असतील, तर 'स्टीफन' तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवा. सिनेमातील कलाकारांचा अभिनय इतका नैसर्गिक आहे की, तुम्हाला तो चित्रपट वाटणार नाही, तर तुमच्या समोर घडणारी एखादी घटना वाटेल. विशेषतः या सिनेमाचा क्लायमॅक्स तुमच्या विचारांच्या पलीकडचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Best Psycho-Thriller: 123 मिनिटांत डोकं होईल सुन्न! 9 हत्यांमागचं भयाण गुपित; OTT वर 'या' सायकॉलॉजिकल थ्रिलरचा धुमाकूळ!