OTT Crime Thriller: 7 एपिसोडची सीरिज आहे सस्पेन्सचा बाप, 'हा' क्राईम थ्रिलर पाहून सटकेल डोकं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Crime Thriller: ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर वेब सिरीजची जास्त मागणी असते. खून, सस्पेन्स आणि चौकशी यांची जुगलबंदी असलेल्या सीरिजना प्रेक्षक जास्त पसंती देतात. अशाच एका नव्या क्राइम थ्रिलरने सध्या ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
1/7

ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर थ्रिलर वेब सिरीजची जास्त मागणी असते. खून, सस्पेन्स आणि चौकशी यांची जुगलबंदी असलेल्या सीरिजना प्रेक्षक जास्त पसंती देतात. अशाच एका नव्या क्राइम थ्रिलरने सध्या ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे." width="1200" height="900" /> ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर वेब सिरीजची जास्त मागणी असते. खून, सस्पेन्स आणि चौकशी यांची जुगलबंदी असलेल्या सीरिजना प्रेक्षक जास्त पसंती देतात. अशाच एका नव्या क्राइम थ्रिलरने सध्या ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
2/7
या सीरीजचं कथानक छत्तीसगडमधील एका दुर्गम गावाच्या पार्श्वभूमीवर घडते. एका रात्री पोलिस स्टेशनला आलेला रहस्यमय फोन सर्व गोष्टींची सुरुवात करतो. फोनवरून जंगलात बोलावलं जातं आणि तिथे पोलिस पोहोचतात तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एक भयानक दृश्य दिसतं.
advertisement
3/7
जंगलात गेल्यावर पोलिसांना दिसतं, डोकं नसलेला मृतदेह. हा तपास जसजसा पुढे जातो, तसतसे जंगलातून आणखी प्रेतं सापडू लागतात. प्रत्येक खुनामागे लपलेला चेहरा उघड करताना पोलिस दल हादरतो.
advertisement
4/7
शेवटच्या भागात उलगडतं की खुनी एकटा नसून, डझनभर खून करणारा निर्दयी गुन्हेगार आहे. ही मालिका केवळ खून आणि तपासापुरती मर्यादित नाही. जातीयवाद, सामाजिक विषमता आणि गावाकडच्या वास्तवावरही ती प्रकाश टाकते. म्हणूनच प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनी तिला दाद दिली आहे.
advertisement
5/7
आपण बोलत असलेल्या या सीरीजचं नाव आहे ‘जनावर’. IMDb वर 7.5/10 रेटिंग मिळालं आहे. ZEE5 वर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सिरीज “जनावर: The Beast Within” प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर मालिका 26 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन उपलब्ध आहे.
advertisement
6/7
सात एपिसोडच्या या सीरीजमध्ये भुवन अरोरा मुख्य पोलिस अधिकारी हेमंत कुमारच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक सचिंद्र वत्स यांनी मालिकेतील प्रत्येक पात्र आणि रहस्यावर विशेष लक्ष दिले आहे.
advertisement
7/7
प्रेक्षकांना मालिकेतील गूढ रहस्य, थरारक ट्विस्ट्स, आणि भुवन अरोरा यांच्या दमदार अभिनयमुळे मालिकेची प्रत्येक भागात उत्कंठा कायम राहते.जर तुम्हाला क्राइम, सस्पेन्स आणि थ्रिलरची मेजवानी हवी असेल, तर “जनावर: The Beast Within” नक्कीच पाहण्यासारखी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Crime Thriller: 7 एपिसोडची सीरिज आहे सस्पेन्सचा बाप, 'हा' क्राईम थ्रिलर पाहून सटकेल डोकं