OTT Trending: ना अॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Trending:अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलरने भरलेल्या कंटेंटमध्ये एक असा चित्रपट आलाय ज्यात रक्तपात नाही, गनफाईट नाही, पण प्रेम, नाती आणि भावना आहेत. सध्या ओटीटीवर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
advertisement
1/7

अ‍ॅक्शन, क्राइम आणि थ्रिलरने भरलेल्या कंटेंटमध्ये एक असा चित्रपट आलाय ज्यात रक्तपात नाही, गनफाईट नाही, पण प्रेम, नाती आणि भावना आहेत. सध्या ओटीटीवर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
advertisement
2/7
डिजिटल रिलीज होताच तो टॉप ट्रेंडिंग यादीत दाखल झाला आहे. हलक्या फुलक्या कथेमुळे आणि नात्यांच्या गुंतागुंतीला दिलेल्या सुंदर स्पर्शामुळे प्रेक्षकांना तो खूप भावतो आहे.
advertisement
3/7
हा संगीतमय रोमँटिक ड्रामा आहे ज्यात चार जोडप्यांची कहाणी दाखवली आहे. कुणी लग्नानंतर आनंदी नाही, कुणी अजून निर्णय घेण्यात गोंधळलेलं आहे, तर काही करिअरच्या आव्हानांमुळे नात्यात अडकलेले आहेत.
advertisement
4/7
ही वेगवेगळी पात्रं पडद्यावर एकत्र येतात आणि त्यांच्या आयुष्याची वेगळीच झलक देतात. आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे, 'मेट्रो इन दिनो'. या चित्रपटात अली फजल, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर आणि पंकज त्रिपाठी यांसारखे दमदार कलाकार झळकतात. नीना गुप्ता एका अशा स्त्रीची भूमिका करते जी कॉलेजमधील जुने प्रेम पुन्हा भेटल्यावर भूतकाळात रमते.
advertisement
5/7
दिग्दर्शन अनुराग बसू यांनी केले आहे. त्यांनीच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्यांच्या स्टाईलप्रमाणेच, यातही वास्तव आणि भावना उत्तमरीत्या मिसळलेले दिसतात.
advertisement
6/7
29 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने लगेच लोकप्रियतेत झेप घेतली. सध्या तो भारतातील टॉप 10 लिस्टमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. "सैयारा," "इन्स्पेक्टर झेंडे," "मटेरियलिस्ट्स" आणि विजय देवरकोंडाचा "किंगडम" या चित्रपटांच्या मागोमाग त्याने स्थान मिळवलं आहे.
advertisement
7/7
IMDb वर सिनेमाला 10 पैकी 6.8 रेटिंग मिळालं असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केली आहे. भारतात 647 दशलक्ष तर जागतिक स्तरावर 682.9 दशलक्ष इतका गल्ला जमवला आहे. जर तुम्हाला हलक्या-फुलक्या पण भावनिक कथांचा आनंद घ्यायचा असेल, तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला हरकत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Trending: ना अॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट