TRENDING:

Janhvi Kapoor: 'मला 3 मुलं पाहिजे आणि...' जान्हवी कपूरने सांगितलं फ्युचर प्लॅनिंग, 'या' ठिकाणी होणार स्थायिक!

Last Updated:
janhvi kapoor: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती चित्रपटाच्या प्रमोशदरम्यान कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने किती मुलं हवीत? याविषयी खुलासा केला.
advertisement
1/7
'मला 3 मुलं पाहिजे आणि...' जान्हवी कपूरने सांगितलं फ्युचर प्लॅनिंग
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती चित्रपटाच्या प्रमोशदरम्यान कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने किती मुलं हवीत? याविषयी खुलासा केला.
advertisement
2/7
जान्हवी नेहमीच तिच्या कामाशिवाय पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. आता तिने कपिल शर्माच्या शोमध्ये तिचं फ्युचर प्लॅनिंग शेअर केलं. ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
3/7
जान्हवी म्हणाली, "मला माझ्या नवऱ्यासोबत तीन मुलं हवी आहेत," कारण विचारल्यावर ती म्हणाली, "दोन मुलांमध्ये नेहमी भांडणं होतात, तिसरा असेल तर तो मध्यस्थी करेल. तसंच तीन हा माझ्यासाठी भाग्यवान आकडा आहे."
advertisement
4/7
जान्हवी इथंच थांबली नाही. तिने आणखी एक मजेशीर गोष्ट सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर ती तिच्या नवऱ्यासोबत तिरुपतीमध्ये स्थायिक होणार आहे. "मी माझ्या नवऱ्यासोबत केळीच्या पानावर जेवण करेन, केसात मोगऱ्याची फुलं माळेन, रोज 'गोविंदा गोविंदा' ऐकेन. इतकंच नाही तर मी माझ्या नवऱ्याची मस्त चप्मी मालिश करेन."
advertisement
5/7
हा खुलासा ऐकून करण जोहरने मजेशीर सवाल केला, "लुंगी घालून केळीच्या पानावर जेवण यात काय रोमँटिक आहे?" यावर जान्हवीने खळखळून हसत उत्तर दिलं, "हे खूप रोमँटिक आहे!"
advertisement
6/7
जान्हवीचं तिरुपतीशी खास नातं आहे. ती दरवर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त आणि आई श्रीदेवी यांच्या जयंतीला तिरुपती मंदिरात जाते. त्यामुळेच लग्नानंतर तिथे स्थायिक होण्याचं तिचं स्वप्न असल्याचं तिने सांगितलं.
advertisement
7/7
दरम्यान, तिच्या लग्नाबद्दलही जान्हवीकडे खास प्लॅन आहे. पीकॉक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने उघड केलं होतं की, तिला भव्य लग्न नकोय. तिला फक्त दक्षिण इटलीतील कॅप्री येथील एका यॉटवर साधं लग्न आणि बॅचलरेट पार्टी हवी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Janhvi Kapoor: 'मला 3 मुलं पाहिजे आणि...' जान्हवी कपूरने सांगितलं फ्युचर प्लॅनिंग, 'या' ठिकाणी होणार स्थायिक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल